आयजीएममधील २४ कर्मचाऱ्यांची बदली

आयजीएममधील २४ कर्मचाऱ्यांची बदली

आयजीएममधील २४ कर्मचाऱ्यांची बदली
सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश; पाच ते सात वर्षांहून अधिक काळ सेवा
इचलकरंजी, ता. १८ : इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये (आयजीएम) पाच ते सात वर्षांहून अधिक काळ सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. अन्य ठिकाणी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ६ वैद्यकीय अधिकारी तर अन्य १८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आयाजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित झाल्यानंतर आता कुठेतरी स्थिरावत असताना कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या रुग्णालयसमोर पुन्हा समस्या निर्माण करीत आहेत. बदली झालेल्यांच्या जागी तत्काळ कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली नसल्यास कामाचा अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांना सहन करावा लागणार आहे. त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आयजीएम रुग्णालयामधील पाच ते सात वर्षे कार्यकाल पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची ऑनलाईन माहिती आरोग्य विभागाकडून घेतली होती. त्यानुसार आयजीएममधील २४ कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली केली आहे. रुग्णालयास २०० वरून ३०० बेडची मंजुरी मिळाल्याने रुग्णालय सुसज्ज होण्यास गती मिळेल. रुग्णालय अपुऱ्या समस्येशी झगडत असताना १०० बेड वाढीमुळे नव्याने १५२ कर्मचाऱ्यांची भरती होणार. त्यामुळे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभावामुळे रुग्णालयातील बंद असलेले अनेक विभाग पुन्हा सुरू होणार अशी अपेक्षा शहरवासीयांमधून व्यक्त होत होती. मात्र रुग्णालय आधीच अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्येशी झगडत असताना २४ कर्मचाऱ्यांची बदली झाल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढणार आहे.
आयजीएम २०१७ मध्ये राज्य शासनाकडे हस्तांतरण केले. मात्र हस्तांतरानंतरही अनेक वर्षे रुग्णालय दुरवस्थेतच होते. तीन-चार वर्षांनंतर रुग्णालयास आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या रुग्णालय मल्‍टिस्पेशालिटी रुग्णालयाचे रूप धारण करीत आहे. असे असताना कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बादल्यांमुळे रुग्णांच्यावर उपचारास अडथळा निर्माण होणार नाही ना? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. दरम्यान, एक वैद्यकीय अधिकारी आयजीएम रुग्णालयात हजर झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडू सांगण्यात आले.
----------------------------
दोन वैद्यकीय अधिकारी कार्यमुक्त
आयजीएममधील सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. त्यामधील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना आयजीएम रुग्णालय प्रशासनाने कार्यमुक्त केले आहे. अन्य कर्मचाऱ्यांना ही लवकरच कार्यमुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. यामधील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे उपचारादरम्यान रुग्णांसोबत आपुलकेपणाचे वागणे यामुळे त्यांची बदली थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
----------------
कर्मचारी संख्या दृष्‍टिक्षेप
गट* मंजूर पदे* भरलेली पदे* रिक्त पदे
अ वर्ग-१* १८*४*१४
अ वर्ग-२* २८*२७*१
ब वर्ग* २*२*०
शूश्रुषा क वर्ग*९३*७९*१४
तांत्रिक क वर्ग *२९*१४*१५
कार्यालयीन क वर्ग *१०*९*१
चार वर्ग * ३८*१०*२८
एकूण * २१८*१४५*७३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com