तनिष्का गीत मैफिल

तनिष्का गीत मैफिल

लोगो - तनिष्का
-
फोटो - 10192

‘तनिष्का’नी अनुभवली ‘निखळ’ मैफिल
सुख- दुखांच्या गाण्यात रमले प्रेक्षक ः तनिष्का व्यासपीठ माध्यम प्रायोजक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः हॅपी सॉंग आणि सॅड सॉंगचा अनोखा नजराणा पेश करत शनिवारी (ता.१७) हौशी कलाकारांनी करा ओके ट्रॅकवर गाणी गात प्रेक्षकांची मने जिंकली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या करा ओके ट्रॅकवरील गीत मैफिलीत १८ हून अधिक कलाकारांनी तब्बल २४ गाणी सादर केली. निमित्त होते, निखळ आनंद परिवार आयोजित ‘कभी खुशी, कभी गम’ या गीत मैफिलीचे. ‘सकाळ’ माध्यम समुहाचे ‘तनिष्का’ व्यासपीठ हे या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
‘तडफ... तडफके इस दिल से...’, ‘तुही रे..’, ‘मेरे उम्र के नौजवानो’, ‘सच कह रहा है दिवाना’, ‘मैं यहॉं, तु वहॉं’, ‘घुंघट तो जरा खोलो’, ‘मेरे नैना सावन बाधो’, ‘तोता, मेरे तोता’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘दुनिया मे लोगों के’ व ‘छोड दे सारी दुनिया किसी के लिए’ अशा सुख - दुखांच्या भावना व्यक्त करणाऱ्या गाण्यांनी कधी प्रेक्षकांना डोलायला लावले तर कधी डोळ्यांत पाणी आणले.
बीना अपराध, सई लकडे, धनश्री नाझरे, जास्वंदी कुलकर्णी, संगीता पाटील, राजश्री निंबाळकर, स्नेहा पाटील, पूनम थोरात, सरदार पाटील, अरूण उलपे, मच्छिंद्र कारंडे, केदार कुलकर्णी, सचिन मेहता, संदीप व्हटकर, प्रवीण डी, चेतन बागल, कुतुब मुजावर व श्रीनिवास कुलबुर्गी आदी कलाकारांनी गाणी गायली.
‘तनिष्का’चे समन्वयक राजेंद्र जाधव, सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे, मंजिरी देवाण्णावर, दत्तात्रय भोसले उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसाद जमदग्नी यांनी केले. सरदार पाटील यांनी आभार मानले.

चौकट
‘वन्स मोअर’ची फर्माईश
मैफिल सुरू होताच हौशी कलाकारांनी एकापेक्षा एक गीते सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आनंद देणाऱ्या गाण्यांसोबत ‘तडफ तडफ के...’ अशा विरह गीतांनाही प्रेक्षकांचा वन्स मोअर मिळाला. कलाकारांनीही प्रेक्षकांना नाराज न करता गाण्यांचा मनसोक्त आनंद दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com