पाणीपुरवठा कमी दाबाने

पाणीपुरवठा कमी दाबाने

Published on

शहरात आजपासन दिवसाआड पाणी
नागरिकांनी केली जादा साठवणुकीची व्यवस्था

कोल्हापूर, ता. १८ ः दोन दिवस विविध जलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीतील गाळ काढण्याचे काम केले असल्याने आज शहराच्या जवळपास निम्म्या भागात कमी दाबाने पाणी मिळाले. तसेच नेहमीपेक्षा कमी वेळ दिले. काही उंच भागात कमी पाणी मिळाले. पण, दिवसभरात टॅंकरची मागणी कमी होती. २४ ठिकाणी टॅंकरद्वारा पाणी दिले. उद्यापासून (ता.१९) दिवसाआड पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे अनेकांनी जादा पाणी भरून ठेवण्याची व्यवस्था करून ठेवली.
पावसाला सुरूवात होऊन नदीमध्ये पाणी पातळी योग्य होत नाही, तोपर्यंत उद्यापासून दिवसाआड पाणी दिले जाणार आहे. पहिल्या दिवशी शहराच्या पश्‍चिमेकडील भाग तर दुसऱ्या दिवशी पूर्वेकडील भाग अशी ढोबळ विभागणी केली आहे. फुलेवाडी रिंगरोडवरील काही काही भाग अपवाद आहेत. पण, साऱ्यांना दिवसाआड पाणी मिळणार असल्याने नागरिकांनी तयारी केली आहे. मध्यवस्तीत पाणीसाठवणुकीची अनेकांकडे जागा नसल्याने जादा पाण्यासाठी बॅरेल, पाण्याची टाकी आणून ठेवल्या आहेत. तसेच आज पाणी मिळाल्यानंतर ती भरूनही ठेवली आहेत.
दोन दिवस टाकींची स्वच्छता केल्याने आज काही भागात कमी दाबाने पाणी मिळणार होते. त्याप्रमाणे काही भागात कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणी मिळाले. तर काही भागात दिवसभरात दोनदा पाणी आले. त्यामुळे आज काहींना टंचाई वाटली तर काहींना नेहमीपेक्षा चांगला पाणीपुरवठा वाटला. गेल्या काही दिवसांपेक्षा टॅंकरला आज कमी मागणी होती. कळंबा व कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रावरून २४ ठिकाणी टॅंकर पाठवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.