जिल्हा बँक कर्मचारी

जिल्हा बँक कर्मचारी

Published on

जिल्हा बँकेत निवृत्त कर्मचारी
अकरा महिन्यांच्या करारावर
---
कॅशिअर, लिपिक, शिपाई, चालकांना मिळणार संधी
कोल्हापूर, ता. १८ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेत निवृत्त झालेले कॅशिअर, लिपिक, शिपाई व चालकांना अकरा महिन्यांच्या करारावर कंत्राटी कर्मचारी म्हणून घेतले जाणार आहे. गुरुवार (ता. २२)पर्यंत इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेतील नियम-अटींमुळे बँकेत नवीन तरुणांना संधी दिली जात नाही. तर, निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी दिली जात आहे. यातही कॅशिअर, लिपिक, शिपाई व चालकपदाची आवश्‍यकता असताना काहींनी उपव्यवस्थापक, शाखाधिकारी पदासाठी ‘फिल्डिंग’ लावली होती. ज्यांनी वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले, त्यांना परत बँकेत काम करायचे आहे. अशांची ठरलेल्या पदावरच नियुक्ती केली जाईल. तीच कामे त्यांना करावी लागणार आहेत. अजूनही काहींनी निरीक्षक, शाखाधिकारी व मुख्य कार्यालयात व्यवस्थापक म्हणून येण्यासाठी आग्रह धरला आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयात अनेक जण उपव्यवस्थापक म्हणून येण्यास तयार आहेत. नऊ जण पुन्हा निरीक्षक म्हणून, १७ जण शाखा अधिकारी म्हणून, तर तीन निवृत्त अधिकारी उपव्यवस्थापक म्हणून येण्यास तयार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सध्या जिल्हा बँक फायद्यात आणि सक्षम आहे. बँकेचा कारभार अधिकाधिक सुधारण्यासाठी संचालकांना आणखी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे संबंधित पदांवर जो कर्मचारी काम करू शकेल, अशाच कर्मचाऱ्यांची भरती होईल, अशी शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.