थेट पाईप

थेट पाईप

Published on

थेट पाईपलाईनचा मार्ग मोकळा

हळदी, अर्जुनवाडा येथील जोडण्यांतील अडसर दूर

कोल्हापूर, ता. १८ ः थेट पाईपलाईन योजनेतील काळम्मावाडी धरणक्षेत्र ते पुईखडीपर्यंत पाईपलाईन टाकली आहे. मात्र, त्यातील हळदी व अर्जुनवाडा या दोन ठिकाणी पाईप जोडण्याच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यामुळे काही मीटरची जोडणी थांबली होती. त्यांच्याशी चर्चा करून महापालिकेने मार्ग काढला असून, पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यात आता काहीच अडचण राहिलेली नाही, असे महापालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.
योजनेतील जॅकवेलचे काम, इंटेक वेल, इन्स्पेक्शन वेल काम झाले. त्यामुळे कॉपर डॅमच्या साहित्याने पाईपलाईनला अडथळा होऊ नये म्हणून तो पूर्ण हटवण्याचे काम सुरू आहे. धरणातील पाणी कमी झाले असल्याने जास्तीत जास्त कॉपर डॅम काढण्याची संधी आहे. पाऊस सुरू होऊन धरणातील पाणी वाढल्यानंतर जॅकवेलमध्ये पाणी येणार आहे. दुसरीकडे पुईखडीपर्यंतची पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे. त्यातील काही जोड स्थानिकांच्या विविध मागण्यांमुळे पूर्ण झाले नव्हते. त्यात हळदी, अर्जुनवाडा गावांतील काही मीटरच्या कामाचा समावेश होता. त्यासाठी श्री. सरनोबत यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढला. आता हे दोन जोड पूर्ण झाल्यानंतर पाईपलाईनचे काम मार्गी लागणार आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला वीजवाहिन्यांचे काम सुरू आहे, तर जॅकवेलवरील पंप हाऊसचे काम पूर्णत्वाला आले असून उपसा पंप जोडण्यासाठीची तयारी सुरू आहे. कॉपर डॅम सोडल्यास पावसात ही कामे पूर्ण करता येणार आहेत. त्यामुळे पुढील महिनाभरात ती पूर्ण होतील, असे श्री. सरनोबत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.