जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालय

Published on

नवभारत साक्षरता वर्ग
तत्काळ सुरू करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर, ता. ५ : नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे कामकाज प्रभावीपणे व्‍हावे. यासाठी, साक्षरता वर्ग तत्काळ सुरू करावेत, अशा सूचना देऊन या कामासाठी स्वयंसेवकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत २०२२-२३ ते २०२६-२७ या दरम्यान १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्याकरिता नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समिती गठित केली आहे.
अभियानात सहभागी तसेच सहाय्यासाठी विनावेतन, विनामानधन तत्त्वावर सेवाभावी वृत्तीने स्वयंसेवक काम करु शकतात. मुख्याध्यापकांनी शाळांतील शिक्षकांना या कामासाठी प्रोत्साहन द्यावे. सर्वेक्षणासाठी व स्वयंसेवक म्हणून कामकाज करण्यासाठी शिक्षक, पंचायत राज संस्था, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्त्या तसेच नेहरू युवा केंद्र, एनएसएस, एनसीसी व स्काऊट-गाईडमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर स्वयंसेवी संस्था यांचाही सहभाग घ्यावा. नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी इच्छुक स्वयंसेवकांनी संबंधित परिसरातील शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असेही श्री. रेखावार यांनी सांगितले. यावेळी जिल्हास्तरीय नियामक मंडळाच्या सभेस शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे, उपशिक्षणाधिकारी केतन शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही. टी. पाटील, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वाय. बी. पाटील, शासकीय विद्यानिकेतनचे बाजीराव पाटील, प्राथमिक शिक्षण विभागाचे प्र. उपशिक्षणाधिकारी उदय सरनाईक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.