निवृत्त कर्मचाऱ्यांनी पाळला काळा दिवस

निवृत्त कर्मचाऱ्यांनी पाळला काळा दिवस

Published on

gad62.jpg
14257
गडहिंग्लज : भारत संचार निगम पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे बीएसएनएल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------------
निवृत्त कर्मचाऱ्यांनी पाळला काळा दिवस
‘बीएसएनएल’ कार्यालयासमोर निदर्शने; पेन्शनच्या पुनर्रचनेसाठी आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : पेन्शनची पुनर्रचना करावी या मागणीसाठी ‘बीएसएनएल’च्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी आज काळा दिवस पाळला. या देशव्यापी आंदोलनात भारत संचार निगम पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली येथील निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. वडरगे मार्गावरील कार्यालयासमोर निदर्शने केली. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
केंद्र शासनाने १५ टक्के फिटमेंटसह पेन्शनची पुनर्रचना करण्याचे आश्वासन दिले होते. १ जानेवारी २०१७ पासून ही वाढ देणे अपेक्षित होते. पण, निवृत्त कर्मचाऱ्यांना ती मिळालेली नाही. २०१७ पासूनच्या फरकासह ही वाढ मिळावी याबाबत भारत संचार निगम पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनने पत्रव्यवहार केला आहे. पण, केंद्र शासनाने त्याबाबत वेळकाढू धोरण स्वीकारले आहे. मागणीबाबत टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी आज काळा दिवस पाळला.
येथील वडरगे मार्गावरील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर सकाळी अकराच्या सुमारास निवृत्त कर्मचारी जमले. त्यांनी जोरदार निदर्शने केली. पेन्शन आमच्या हक्काची..., पेन्शनची पुनर्रचना झालीच पाहिजे... आदी घोषणासह केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. एस. बी. हवालदार, अमृत देसाई, एस. एस. बंदी, अजय पाटील, विजय पाटील, आर. बी. हिरमेठ, आर. बी. महाडीक यांची भाषणे झाली. डी. डी. दळवी, डी. एस. शिंदे, डी. पी. पाटील, पी. के. निर्मळकर, ए. पी. लतीफ, एस. आय. रावण, आर. ए. पाटील, ए. व्ही. चव्हाण आदिंनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.