शिवराज महाविद्यालयात वृक्षारोपण

शिवराज महाविद्यालयात वृक्षारोपण

Published on

gad63.jpg
14278
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात प्रा. सुनील शिंत्रे, अॅड. दिग्विजय कुराडे, बसवराज आजरी यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.
----------------------------
शिवराज महाविद्यालयात वृक्षारोपण
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाचा क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व गांधी विचार मंचातर्फे वृक्षारोपण केले. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, प्राचार्य कल्याणराव पुजारी, शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, संचालक बसवराज आजरी, अशोक पट्टणशेट्टी आदींच्या हस्ते वृक्षारोपण झाले. गांधी विचार मंचचे आप्पासाहेब कमलाकर, ईश्वर दावणे, नॅकचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदूम, प्रा. जयवंत पाटील आदी उपस्थित होते. निवृत्त वनपाल डी. बी. काटकर यांच्या सहकार्याने महाविद्यालयाला रोपे प्राप्त झाली आहेत. महाविद्यालयाच्या परिसरात बेल, करंज, आंबा, जांभूळ, फणस आदी जातींची तीस रोपे लावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.