सोहाळेत चारसुत्री भात शेतीचा प्रयोग

सोहाळेत चारसुत्री भात शेतीचा प्रयोग

ajr 64.jpg....
14372
सोहाळे (ता. आजरा) ः येथे स्मार्ट प्रकल्पांतर्गत चार सूत्री भातशेतीची लागवड सूर्यकांत दोरुगडे व शेतकऱ्यांनी केली.
-----------------
सोहाळेत चारसुत्री भात शेतीचा प्रयोग
स्मार्ट प्रकल्पांतर्गत उपक्रम ः ‘इंद्रायणी’ची एक एकरमध्ये लागवड
रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ६ ः सोहाळे (ता. आजरा) येथे चारसुत्री भात शेतीचा प्रयोग केला आहे. येथे स्मार्ट प्रकल्प अंतर्गत मुल्यसाखळी विकास शाळेच्या माध्यमातून शेतकरी शेतीशाळा झाली.
प्रगतशील शेतकरी व संसाधन शेतकरी सुर्यकांत दोरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत देसाई यांच्या शेतावर चारसुत्रीचे प्रात्यक्षिक झाले. इंद्रायणी भाताची सुमारे एक एकर क्षेत्रात लागवड केली. विक्रांत देसाई, सोहाळे व बाचीमधील शेतकरी उपस्थित होते.
श्री. दोरुगडे म्हणाले, ‘चारसूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने रोपांची चांगली वाढ होते. पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते. चांगले उत्पादन मिळते. याचे पहिले सुत्र हे भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळावी. त्यानंतर प्रती गुंठा गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) झाडाची पाने चिखलणीपूर्वी सात ते आठ दिवस अगोदर पसरावीत. भात लागवड नियंत्रित लावणी पध्दतीने करावी. भात लागवड करावयाच्या सुधारित दोरीवर १५ सेंमी व २५ सेंमी आलटून पालटून (१५-२५-१५-२५ सें.मी.) अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर १५ सेंमीवर असलेल्या (प्रत्येक तीन ते चार रोपे/चूड) अशा प्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावण करावी. युरिया-डीएपी ब्रिकेटचा वापर -नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध युरिया-डीएपी एक ब्रिकेट हाताने खोचावी.’ रविंद्र देसाई, धनाजी गाडे, शशिकांत कोंडुसकर, संभाजी देसाई, विजय गुरव, लिला दोरुगडे, इंदुबाई कांबळे, लता डोंगरे आदी शेतकरी उपस्थित होते.
-----
चार सुत्रीचे फायदे
बियाणांत बचत
मजूरात बचत
खतामध्ये बचत
कमी दिवसात जास्त लागण होते
उत्पादनात वाढ
-----------
दोरुगडे हे दहा वर्षे चारसुत्री श्री पध्दतीने शेती करीत आहेत. सोहाळेत यंदा मोठ्या प्रमाणात चारसुत्री पध्दतीने भात लागवड होणार आहे. शेतकऱ्यांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आजरा तालुक्यात चारसुत्री पध्दतीने भात लागवड होणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.
- अमित यमगेकर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com