‘महाराष्ट्र चेंबर’तर्फे आज इचलकरंजीत निर्यातक्षम व्यापार उद्योग परिषद

‘महाराष्ट्र चेंबर’तर्फे आज इचलकरंजीत निर्यातक्षम व्यापार उद्योग परिषद

Published on

इचलकरंजीत आज निर्यातक्षम
व्यापार उद्योग परिषद ः गांधी

कोल्हापूर, ता. ६ ः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीतर्फे उद्या (शुक्रवारी) निर्यातक्षम व्यापार उद्योग परिषद इचलकरंजी येथे होणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र चेंबर’चे अध्यक्ष ललित गांधी आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्य नितीन धूत, को-चेअरमन मयूर शहा यांनी दिली. दरम्यान, सकाळी ११ वाजता ‘महाराष्ट्र चेंबर’च्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होईल. दुपारी सदस्य टेक्स्टाईल प्रोसेसिंग मेगा क्लस्टर गारमेंट क्लस्टरसह अन्य महत्त्वपूर्ण प्रकल्पांना भेटी देतील.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम टेक्स्टाईल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ही परिषद होईल. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसायातील तज्ज्ञ मार्गदर्शक सल्लागार प्रशिक्षक मिहीर अजित शहा मार्गदर्शन करतील, अशी माहिती ललित गांधी यांनी दिली. कल्लाप्पा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीच्या उद्‌घाटन होईल. या बैठकीस मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, धुळे, पुणे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणसह अन्य जिल्ह्यांतील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.