१०० कोटींसाठी पाच कंपनी इच्छूक

१०० कोटींसाठी पाच कंपनी इच्छूक

शहरातील रस्ते कामांसाठी
पाच कंपन्या इच्छुक
कोल्हापूर, ता. ६ ः शहरातील मुख्य १६ रस्त्यांच्या १०० कोटीच्या कामांसाठी स्थानिकांसह पुणे, अहमदनगर अशा विविध ठिकाणच्या पाच ठेकेदार कंपनी इच्छुक दिसत आहेत. आज निविदेबाबतच्या प्रिबीड बैठकीत त्यांच्याकडून विविध मुद्द्यांवर सूचना करण्यात आल्या.
राज्य शासनाने दिलेल्या निधीनुसार महापालिकेने १६ रस्‍त्यांची निविदा जाहीर केली आहे. त्यामध्ये विविध अटी-शर्ती आहेत. त्यादृष्टीने आज प्रिबीड बैठक आयोजित केली होती. त्यात स्थानिक निर्माण कन्स्ट्रक्शन, पुणे येथील एमके इन्फ्रा, आरई इन्फ्रा, ॲरलॅम तसेच अहमदनगर असे पाच ठेकेदार कंपनी उपस्थित होत्या. त्यात कोरोना कालावधी उलाढालीच्या अटीतून वगळावा, अशा सूचना केल्या. महापालिकेने त्यांना त्यासंबंधीचे अध्यादेश, परिपत्रके सादर करण्यास सांगितले. त्यांच्याकडून आलेल्या कागदपत्रांनुसार सूचना योग्य असतील, तर महापालिका निविदेमध्ये त्याचा समावेश करेल. अन्यथा निविदा जैसे थे ठेवण्यात येईल. निविदेत १४ जुलैपर्यंतची मुदत निविदा भरण्यास दिली आहे. १९ जुलै ही निविदा उघडण्याची तारीख आहे. पण महापालिकेला सूचनांची खात्री करण्यासाठी कालावधी लागल्यास भरण्याची मुदत वाढवली जाऊ शकते. त्यामुळे निविदा उघडण्याचीही तारीख वाढवली जाईल.
यापूर्वी नगरोत्थानमधून केलेल्या रस्त्यांसाठी विविध ठिकाणचे ठेकेदार आले होते. कामकाज व्यवस्थित करून घेण्याची महापालिकेवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेतून योग्य ठेकेदार निवडला जाणे फार महत्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com