हसन मुश्रीफ स्वागत बैठक

हसन मुश्रीफ स्वागत बैठक

Published on

14456

मंत्री मुश्रीफ यांचे जोरदार
स्वागत करण्याचा निर्धार

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक, कोल्हापुरात आज आगमन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांचे उद्या (शुक्रवारी) येथे आगमन होणार आहे. श्री. मुश्रीफ यांचे जोरदार स्वागत करण्याचा निर्धार आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत झाला. जिल्हा बॅंकेत ही बैठक झाली.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, ‘मंत्री मुश्रीफ यांनी तीस-पस्तीस वर्षांत लोकाभिमुख समाजकारण केले आहे. त्यांना ताकद देऊया आणि त्यांचे नेतृत्व वाढवूया.’
इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट म्हणाले, ‘इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री मुश्रीफ यांनी नेहमीच योगदान दिले आहे. इचलकरंजीतील पक्ष-संघटना मजबूत करण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने काम केले जाईल.’
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने, कोल्हापूर महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, जिल्हा बॅंकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड,
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भरत पाटील-भुयेकर, उपाध्यक्ष शंकर पाटील, संचालक बी. जी. पाटील, माजी नगरसेवक रमेश पोवार, ॲड. प्रकाश देसाई, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर-खेबवडे, शिरीष देसाई यांची भाषणे झाली.
जिल्हा दूध संघाचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, माजी संचालक विलासराव गाताडे, ‘गोकुळ’चे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, नावीद मुश्रीफ, संदीप कवाळे, विकास पाटील, असिफ फरास, प्रकाश गवंडी, महेंद्र चव्हाण, जयदीप गाताडे आदी उपस्थित होते. मनोज फराकटे यांनी स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.