चाकणकर राजकीय बातमी

चाकणकर राजकीय बातमी

Published on

‘आयोगाची अध्यक्षा झाल्यानंतर महिला
प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागितला’
कोल्हापूर: राज्य महिला आयोगाची अध्यक्षा झाल्यानंतर राष्ट्रवादीतील महिला पदाधिकाऱ्यांनी माझा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितला. त्यानंतर पुढील पंधरा महिने राष्ट्रवादीच्या एकाही कार्यक्रमात सहभागी करुन घेतले नाही, अशी खंत व्यक्त करत राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्य महिला आयोगाची मी आठवी अध्यक्षा आहे. आपल्याअगोदर सात अध्यक्षा होत्या. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्या पदावरुन राज्याचा कारभार पाहत होत्या. दरम्यान, महिला आयोगाचे पद दिल्यानंतर राष्ट्रवादीचे पद सांभाळता येणार नाही, असे सांगून राजीनामा देण्यास भाग पाडले. पक्षाच्या पदाचा राजीनामा घेतला त्यावेळी मला वेदना झाल्या. सध्या आपण पक्ष बदलेला नाही, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाली काम करत असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.