पाऊस ६ जुलै २०२३

पाऊस ६ जुलै २०२३

दमदार पावसाने जिल्ह्याला दिलासा
पेरण्यांना गत; राधानगरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : जिल्ह्यात आज ऑरेंज अर्लट जाहीर केला होता. त्यानुसार हा अंदाज खरा ठरवत आज सकाळपासूनच जोरदार पावसाने जिल्ह्याला दिलासा दिला. पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.
राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात अनेक वेळा यलो अर्लट, ऑरेंज अर्लट जारी केले. मात्र, हे अंदाज फोल ठरले. पाऊस होण्याऐवजी आकाश निरभ्रच राहिलेले दिसले. आज मात्र ऑरेंज अर्लट जारी केलेल्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी सहापासूनच मध्यम ते मोठ्या पावसाने सुरुवात केली. दुपारनंतर जोरदार सरी बरसल्या. याचवेळी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावून पाणीसाठ्यात वाढ करण्यास मदत केली आहे. गेल्या चोवीस तासात राधानगरी धरण परिसरात ६४ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक १४७ मिली मीटर पाऊस पाटगाव धरण परिसरात झाला आहे.
दरम्यान आज झालेल्या पावसाची नोंद उद्यापर्यंत होणार असून, आत्तापर्यंत ज्य तालुक्यात पाऊस झाला नाही त्या शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे. करवीर तालुक्याच पश्‍चिम भागातही मुसळधार पावसामुळे उसाच्या शेतातील सऱ्या पूर्ण भरुन वाहत आहेत. ओढे आणि नाल्यांनाही पाणी आले. आजच्या पावसामुळे जिल्ह्यात पेरण्यांना गती आली आहे. पेरून उगवलेल्या पिकांना उभारी मिळाली आहे. जिल्ह्यात आणखी दोन ते तीन दिवस याच पद्घतीने पावसांची हजेरी राहणार आहे. रात्री अकरानंतर पावसाने काही वेळ विश्रांती घेतली.

चौकट
अद्याप एकही बंधार पाण्याखाली नाही
गेल्यावर्षी याच दिवसात जिल्ह्यातील पावसाची तब्बल १५० ते २०० मिली मीटर पावसाची नोंद झाली होती. तब्बल ५५ बंधारे पाण्याखाली गेले होते. यावर्षी मात्र अद्याप एकही बंधार पाण्याखाली जाईल ऐवढा पाऊस झालेला नाही. शिंगणापूर बंधाऱ्याचे बरगे काढले नसल्याने तो पाण्याखाली गेला होता. या बंधाऱ्यावरील वाहतूक सुरळीत आहे.
....
चौकट
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा :
धरण* आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
राधानगरी*२.४५
तुळशी*०.८६
वारणा*११.८२
दूधगंगा*२.११
कासारी*०.७५
कडवी*०.८५
कुंभी*१.०५
पाटगाव*१.७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com