१५० कोटींचा पुरवणी आराखडा मंजूर

१५० कोटींचा पुरवणी आराखडा मंजूर

जिल्‍हा परिषदेतून

पाण्यासाठी १५० कोटींचा पुरवणी आराखडा
जलजीवनकडून मंजुरी; १०३ गावांना लाभ, वाढीव तरतूद मात्र तपासण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ८ : जिल्‍ह्यात राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन व पूर्वी राबवलेल्या राष्‍ट्रीय पेयजल व अन्य पाणी योजनांच्या दुरुस्‍ती व वाढीव कामासाठी तब्‍बल १५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून १०३ गावांच्या योजनांचा विस्‍तार आहे, मात्र पुन्‍हा एकदा ही वाढीव तरतूद गरजेची होती का? आणि गरज होती, तर आराखड्यात याचा समावेश का झाला नाही, याचीही तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
राज्यासह जिल्‍ह्यात जलजीवन मिशन योजना सर्व स्‍तरावर चर्चेच्या केंद्रस्‍थानी आहे. अनेक योजनांमध्ये बदल केले जात आहेत. वाढीव योजनेसाठी निधी मागणी होत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी लोकप्रतिनिधींकडे जाऊन विस्‍तारित योजनेची मागणी करत आहेत. या मागणीचा सर्वांगीण विचार न करता, त्यास मंजुरी दिली जात आहे; मात्र या योजनांचा विस्‍तार करण्याची वेळ का आली? जुन्या योजना आता निरुपयोगी ठरत आहेत का? जल जीवनच्या योजनांचा विस्‍तार करण्याची आवश्यकता होती का, असे अनेक प्रश्‍‍न निर्माण झाले आहेत.
-----------------

तालुकावार योजनांची संख्या
आजरा - ४
भुदरगड - ११
चंदगड - १०
गगनबावडा - १
हातकणंगले - ११
कागल - १२
करवीर - १३
पन्‍हाळा - १४
राधानगरी - ११
शाहूवाडी - १०
शिरोळ - ६
----------------
कोट
जिल्‍ह्यात जलजीवन मिशन योजनेची कामे सुरू आहेत. आता पुन्‍हा १५० कोटींच्या पुरवणी मागणीस मंजुरी देण्यात आली आहे. अनेक गावांत कोणाच्या तरी सांगण्यावरून व कोणाच्या तरी सोयीसाठी या योजनांना आता निधी दिला जात आहे. पुरवणी मंजुरीतून निधी दिलेल्या सर्व गावांची पुन्‍हा एकदा खातरजमा करणे आवश्यक आहे. : मनोज फराकटे, माजी जिल्‍हा परिषद सदस्य
-----------------गावातील अपूर्ण कामे, स्‍त्रोतांची दुरुस्‍ती, पर माणसी ५५ लिटरने पाणीपुरवठा करणे आदी कारणांमुळे पुवरणी मागणी करण्यात आली होती. योजनेचे काम सुरु झाल्यानंतर काही गावांत पाणीपुरवठ्याची अडचण निर्माण झाली होती. नव्याने काही कामांचा समावेश करण्यासाठी शासनाकडे निधी मागणी करण्यात आली होती. तो निधी आता प्राप्‍त झाला आहे.
- अशोक धोंगे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com