सकाळ मनी व मिरेतर्फे परिसंवाद

सकाळ मनी व मिरेतर्फे परिसंवाद

Published on

लोगो
...
14871

गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय

तज्ज्ञांचा सल्ला : सकाळ मनी व मिरे ॲसेट म्युच्युअल फंड‌तर्फे व्याख्यान

कोल्हापूर, ता. ८ : ‘योग्य गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा. तुमचं वय कितीही असू देत. पुढील दहा वर्षांची गुंतवणूक ही म्युच्युअल फंडामध्ये असली पाहिजे. तुम्हाला निश्‍चित फायदा होईल,’ असा सल्ला मिरे ॲसेटचे गुंतवणूक तज्ज्ञ मयूर धनोपिया व अर्थतज्ज्ञ सुहास राजदेरकर यांनी उपस्थित गुंतवणूकदारांना दिला. निमित्त होते, एम.एफ. मंत्रा : ॲन इन्व्हेस्टर एज्युकेशन इनिशिएटिव्हचे मिरे ॲसेट म्युच्युअल फंड‌ आणि ‘सकाळ’ मनीतर्फे आयोजित ‘योग्य म्युच्युअल फंड‌ योजनेची निवड कशी करावी, गुंतवणुकीच्या नफ्यातोट्याचे गणित’ यावरील व्याख्यानाचे.
शिवाजी उद्यमनगरमधील इंजिनिअरिंग असोसिएशनच्या माधवराव बुधले सभागृहात व्याख्यान झाले. तत्पूर्वी, धनोपिया, राजदेरकर, कोल्हापूर इन्व्हेस्टर असोसिएशनचे अध्यक्ष विपिन दावडा, ‘सकाळ’ माध्यम समूहाचे कॉर्पोरेट इव्हेंट हेड अनिरुद्ध हजारे, ‘सकाळ मनी’चे संपादक मुकुंद लेले, ‘सकाळ’ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
लेले म्हणाले, ‘तुम्ही सर्वजण योग्यवेळी योग्य ठिकाणी आहात; कारण गुंतवणूक कशी करावी, याचे ज्ञान इथे निश्‍चित मिळेल.’ दावडा म्हणाले, ‘सकाळ मनी हे गुंतवणुकीची साक्षरता देणारे बेस्ट मॅगेझिन आहे. इन्व्हेस्टर असोसिएशनतर्फे आम्ही शेअर बाजार, म्युच्युअल फंडस्‌वर गुंतवणूकदारांना माहिती देण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा आयोजित करतो.’ अजिंक्य पंडित यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रांतील गुंतवणूकदार उपस्थित होते.
...


14870
गुंतवणुकीला लहान वयापासून
सुरवात करा ःसुहास राजदेरकर

सुहास राजदेरकर म्हणाले, ‘शेअर मार्केटपासून तुम्ही दूर राहू नका. शेअर घेण्यापूर्वी अभ्यास करा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागते. यासाठी संयमही असला पाहिजे. म्युच्युअल फंड हा लिगल बिझनेस आहे. यावर ‘सेबी’चे नियंत्रण असते. तुम्ही नक्की पैसे कमवू शकता. याकरिता तुमच्याजवळ आर्थिक शिस्त असली पाहिजे. तुम्ही गुंतवणूक कशामध्ये करता, यासाठीचा अभ्यास असला पाहिजे. भारतात ७५ टक्के लोक हे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. ८० ते ८५ टक्के लोक उतरत्या वयात मुलाबाळांवर पैशासाठी अवलंबून राहतात. यासाठी गुंतवणुकीला लहान वयापासून सुरवात करा. येणारा काळ हा म्युच्युअल फंडसाठी योग्य काळ आहे.’
...


14872
मयूर धनोपिया

मयूर धनोपिया म्हणाले, ‘गुंतवणुकीचा प्रवास हा कुठल्याही वयात सुरु होतो. तुम्ही कशासाठी गुंतवणूक करणार आहात, हे ठरवा. यानंतर गुंतवणुकीसाठी प्रयत्न करा; पण गुंतवणूक कशामध्ये करायची, हे ठरविण्यासाठी तज्ज्ञ, अभ्यासाची आवश्‍यकता असते. गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय आहे. तुम्ही प्रॉपर्टी, इन्शुरन्स, बँक डिपॉझिट, स्टॉक, बॉंडस्‌, गोल्ड अशा विविध क्षेत्रांत गुंतवणूक करू शकता; पण म्युच्युअल फंडमध्ये पारदर्शकता असते. म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी फंड, डेबीट फंड, हायब्रीड फंड असे प्रकार आहेत. यामध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा जरुर सल्ला घ्या. निवृत्तीनंतरचे आयुष्य सुख-समाधानाने जाण्यासाठी आयुष्यात तुम्ही कशामध्ये गुंतवणूक केली आहे, ते महत्वाचे ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.