साथरोग आजार बैठक

साथरोग आजार बैठक

Published on

साथरोग आजारांबाबत
तत्काळ उपाययोजना करा
महापालिकेत बैठक; खबरदारीच्या उपायांवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : शहरातील साथरोग आजारांच्या पार्श्‍वभूमीवर तत्काळ उपाययोजना करा, अशा सूचना आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी दिल्या. शहरात डेंगी, मलेरिया, इतर जलजन्य आणि साथरोग आजारांच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत बैठक झाली. या वेळी ते बोलत होते.
शहरातील विभागीय कार्यालय एक अंतर्गत येणाऱ्या नागरी आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर, आशा वर्कर्स, आरोग्य निरीक्षक, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यामध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, माहिती देणे, प्रबोधन करणे, रक्त तपासण्या, उपचाराबाबत योग्य माहिती देण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे बैठकीत ठरले. औषध फवारणी, धूर फवारणी, कचरा उठावाबाबतही या वेळी सूचना दिल्या. उपाययोजनांसाठी जे काही तांत्रिक यंत्रणा लागेल, ती पुरवण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील यांना दिले. पाणीपुरवठ्याबाबत ज्या तक्रारी असतील त्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची समन्वय साधून उपाययोजना करण्याबाबतही सूचना दिल्या. यावेळी आरोग्याअधिकारी डॉ.प्रकाश पावरा, महापालिकेचे वैद्यीकीय अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी, बांधकाम विभागाकडील अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.