मंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन

मंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन

Published on

14887
...

विनय कोरे, सतेज पाटील
यांनी केले मंत्री मुश्रीफ यांचे अभिनंदन

आमदार जाधव, पाटील, आसगांवकर यांचीही उपस्थिती

कोल्हापूर, ता.८: राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांचे आज सर्वपक्षीय नेत्यांनी स्वागत केले. आमदार सतेज पाटील, विनय कोरे, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, जयंत आसगांवकर, संजय घाटगे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. मंत्री मुश्रीफ यांच्या स्वागतासाठी सर्किट हाऊस येथे मोठी गर्दी झाली होती.
माजी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा बॅंकेचे माजी संचालक पी. जी. शिंदे, ‘भाजप''चे अरुणराव इंगवले, पंचगंगा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. एम. पाटील, दलितमित्र बळवंतराव माने, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, राष्ट्रवादीचे गडहिंग्लज शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, माजी सभापती शारंगधर देशमुख, शाहूवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष महादेव पाटील - साळशीकर, करवीर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर जांभळे, फिरोज सौदागर, गडहिंग्लज नगरपालिकेच्या माजी नगरसेविका कावेरी चौगुले, माजी संचालक अनिल पाटील, पार्श्वनाथ बँकेचे चेअरमन शंकर पाटील, तौफिक मुल्लाणी, माजी उपसभापती पैलवान मारुती ढेरे या प्रमुखांसह कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. राज्य सहकारी बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. ए. बी. माने, अधीक्षक अभियंता श्री. कुंभार, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, महापालिकेच्या अधिकारी टीना गवळी, कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव, मुख्यमंत्री सडक योजनेचे श्री. काटकर, यांनीही मंत्री मुश्रीफ यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.