शिवाजी तंत्रनिकेतन बेकायदेशीर बांधकाम

शिवाजी तंत्रनिकेतन बेकायदेशीर बांधकाम

Published on

14890
कोल्हापूर ः शिवाजी तंत्रनिकेतन परिसरात सुरू असलेले बांधकाम.


‘शिवाजी तंत्रनिकेतन’मध्ये बेकायदा बांधकाम
हेरीटेज वास्तू; महापालिका, समितीची परवानगी नाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः शहरातील प्रस्तावित हेरीटेज वास्तूंच्या यादीत समावेश असलेल्या शिवाजी तंत्रनिकेतनच्या परिसरात सध्या बांधकाम सुरू असून ते बेकायदेशीर आहे. याबाबत महापालिका आणि हेरीटेज समितीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे हेरीटेज समितीसमोर आले. शहराच्या मध्यवर्ती भागातच ही इमारत असून विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह आणि वॉचमनसाठी केबीनचे बांधकाम येथे सुरू आहे.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वाय. बी. पाटील म्हणाले, ‘‘संस्थेत सहाशेहून अधिक विद्यार्थी आहेत. मात्र, त्यांच्यासाठी चांगले स्वच्छतागृह नाही. त्यामुळे स्वच्छतागृहाबरोबरच वॉचमनसाठी छोटी केबीन बांधकामाचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार हे बांधकाम सुरू झाले आहे. मुळ इमारतीत कोणतेही बांधकाम नसून इमारत परिसरात हे बांधकाम आहे. इमारतीच्या सौंदर्याला कोणताही धोका पोचणार नाही, याची खबरदारी घेतली आहे.’’
हेरीटेज समितीचे सदस्य उदय गायकवाड म्हणाले, ‘‘बांधकामासाठी हेरीटेज समितीकडे कोणत्याही प्रकारची परवानगी मागितलेली नाही. मुळात बांधकामाला विरोध नाही. पण, मुळ इमारतीचे सौंदर्य झाकोळून जाईल, असे बांधकाम असू नये. शहरातील अंबाबाई मंदिर असो किंवा आणखी काही ठिकाणी हेरीटेज समितीने बांधकामाला परवानगी दिली आहे. शिवाजी तंत्रनिकेतनच्या बाबतीतही मुळ इमारतीच्या सौंदर्याला धक्का न लागता त्याला पूरक बांधकाम करता येणे शक्य आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.