अकरावी प्रवेश

अकरावी प्रवेश

Published on

अकरावीसाठी दुसऱ्या
फेरीतील निवड यादी प्रसिध्द


कोल्हापूर, ता. ८ ः शहरातील विविध २८ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या प्रवेशासाठीच्या दुसरी फेरीतील निवड यादी आज प्रसिध्द झाली. महाविद्यालय पातळीवर प्रत्यक्ष प्रवेशाच्या कार्यवाहीलाही आजपासून प्रारंभ झाला.
दरम्यान, विज्ञान शाखेसाठी दोन हजार ३८ विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत स्थान मिळालेले नाही. या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवेश देण्यात येणार आहेत. विज्ञान शाखेच्या दोन हजार दोनशे तीन विद्यार्थ्यांना तर वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमांसाठी सर्वच म्हणजे ७८० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश क्षमतेपेक्षा १९४ अर्ज कमी आले तर विज्ञान शाखेकडे क्षमतेपेक्षा १८३ अर्ज जादा दाखल झाले आहेत.
केंद्रीय समितीतर्फे निवड यादी आज प्रसिध्द झाली असून संबंधित यादीतील विद्यार्थ्यांना मंगळवार (ता. ११) पर्यंत सार्वजनिक सुटी वगळून सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रवेश निश्चित करता येणार आहे.
दरम्यान, अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीतील प्रवेश ११ जुलै रोजी पूर्ण होणार आहेत. तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक प्रसिध्द झाले असून त्यानुसार बुधवारी (ता.१२) आणि गुरुवारी (ता.१३) प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी होणार आहे. या फेरीची गुणवत्ता यादी १८ जुलैला प्रसिध्द होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.