कालजयी संगीत संमेलन

कालजयी संगीत संमेलन

14901
...

‘कालजयी’ संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
---
पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन
कोल्हापूर, ता. ८ ः पावसाने दमदार सुरुवात केली असली, तरी आजपासून सुरू झालेल्या ‘कालजयी’ या मैफलीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.
येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात या दोनदिवसीय संगीत संमेलनास आजपासून प्रारंभ झाला. कलापिनी कोमकली, भुवनेश कोमकली, शिरीष सप्रे, व्ही. बी. पाटील, बाळासाहेब घाटगे, रेखा इनामदार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले. संस्कृती मंत्रालय (भारत सरकार), कुमार गंधर्व प्रतिष्ठान (देवास), गायन समाज देवल क्लब आणि गुणीदास फाउंडेशनतर्फे हे संमेलन होत आहे.
पहिल्या सत्रात यशवंत वैष्णव (छत्तीसगड) यांचे सोलो तबलावादन झाले. तीनताल वादनाने त्यांनी वादनाला प्रारंभ केला. पेशकारबरोबरच पंजाब, फरूकाबाद घराण्यातील कायदे, विविध घराण्यांतील पारंपरिक रेला यासह उस्ताद अल्लारखाँ, उस्ताद तिरखवाँ, सुशीलकुमार जैन आदींच्या रचना त्यांनी सादर केल्या. त्यांना अभिषेक शिनकर यांची साथसंगत होती.
दुसऱ्या‍ सत्रात कुमार गंधर्वांच्या कन्या विदुषी कलापिनी कोमकली आणि नातू भुवनेश कोमकली यांनी पं. कुमार गंधर्व यांच्या संकल्पनेतून साकारलेला वर्षा ॠतूवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण रचनांचा ‘गीतवर्षा’ हा कार्यक्रम सादर केला. ‘नयो नयो मेहा’, ‘लागो इंद्रा’, ‘गुरुजी एक निरंतर'', ‘बरसे मेहरवा’ आदी रचना त्यांनी सादर केल्या. अभिषेक शिनकर, पवन सेम, मयांक बेडेकर यांनी समर्पक साथसंगत केली.
दरम्यान, राजप्रसाद धर्माधिकारी यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार झाले. या वेळी सुबोध गद्रे, सचिन पुरोहित, डॉ. अजित शुक्ल, दिलीप बनछोडे आदी उपस्थित होते.
.........

संमेलनात आज...
- गौरी पाठारे, जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन, हर्ष नारायण यांचे सारंगीवादन
- संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. सकाळी नऊ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com