आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त चारा वाटप

आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त चारा वाटप

ich93.jpg
14937
इचलकरंजी ः श्री लक्ष्मीनारायण गौ सेवा प्रतिष्ठानमधील गायींसाठी तीनशे पेंडी चारा देण्यात आला.
आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त चारा वाटप
इचलकरंजी ः माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आवाडे समर्थकांनी श्री लक्ष्मीनारायण गौ सेवा प्रतिष्ठानमधील गायींसाठी तीनशे पेंडी चारा दिला. प्रा. शेखर शहा, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष नाना पाटील, अभिजित कोथळी, जांभळीचे माजी उपसरपंच मारुती चव्हाण, वर्धन होसकल्ले, बबन मुरुगुंडे, प्रकाश यादव, अजय पाटील, श्रीकांत गायकवाड, राहुल पाटील आदी उपस्थित होते.
--------------
व्यापारी पतसंस्था मुख्यालय उद्‍घाटन
इचलकरंजी ः येथील व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण केलेल्या मुख्यालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. नागरी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे यांच्याहस्ते व भगतराम छाबडा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, बालाजी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शिरीष कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्त सागंली रोड शाखेचेही उद्‍घाटन केले. अध्यक्ष सुर्यकांत साखरे यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार केला. उपाध्यक्ष संजय वठारे यांनी आभार मानले.
-----------

14938

रजनी शिंदे यांना डॉक्टरेट
इचलकरंजीः येथील रजनी शिंदे यांना फ्रान्स संलग्न यूसी इंटरनॅशनल एज्युकेशन कौन्सिल फ्रान्स युनिवर्सिटीतर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन `डॉक्टर ऑफ सोशल वर्क` या पदवीने सन्मानित केले. वास्को (गोवा) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. पंधरा वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. दोन राष्ट्रीय व पंधराहून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन चेअरपर्सन डॉ. प्रभू, युनिवर्सिटी अँबेसिडर मिस अनास्थेलिया, महाराष्ट्र स्टेट डायरेक्ट डॉ. गणेश वाईकर यांच्याहस्ते त्यांना सन्मानित केले. सांगली जिल्हा बाल कल्याण समितीचे माजी अध्यक्ष डॉ. गौतम प्रज्ञासूर्य, डॉ. मीना वाईकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोदकुमार माने, कॅप्टन प्रा. डॉ. लक्ष्मीबाई करी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com