निगवे ते शिये महामार्ग रस्ता समस्या - अतिकमणामूळे वाढले अपघात . बिग स्टोरी

निगवे ते शिये महामार्ग रस्ता समस्या - अतिकमणामूळे वाढले अपघात . बिग स्टोरी

लोगो ः बिग स्टोरी
सुधाकर डोणोलीकर


अतिक्रमणाचा विळखा, अपघाताचा दणका
निगवे ते शिये महामार्गावरील चिर ः वाहतुकीची कोडी नित्याचीच

लीड
भुये : निगवे दुमाला (ता. करवीर) ते शिये हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. केर्ले, केर्ली, कुशिरे, निगवे, भुयेवाडी, भुये, जठारवाडी ही गावे रस्त्यानजीक आहेत. निगवे चौकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अनेक लहान मोठे अपघातही होतात. वाहनधारकांना कसरत करून गाडी चालवावी लागते. रस्त्यावर लहान मोठी दुकाने व खाऊच्या गाड्या वाढल्या आहेत.


अपघात कशामुळे
काही वर्षांपूर्वी हा मार्ग राष्ट्रीय महामार्गला जोडल्यामूळे वाहतूक वाढली आहे. अतिक्रमणामुळे अरुंद रस्ता, खचलेल्या बाजू पट्या, गतिरोधकाचा अभाव त्यामूळे अपघात वाढले आहेत.

अपघात क्षेत्र
निगवे, भुयेवाडी, भुये, जठारवाडी, शिये येथे सातत्याने अपघात होतात. साखर कारखाने सुरू झाल्यावर ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी, डंपरची वर्दळ वाढते यामुळे छोटे - मोठे अपघात होतात.

अतिक्रमणाची डोकेदुखी
निगवे ते शिये या मार्गावर जोतीबा तिर्थक्षेत्र असल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविक मोठया प्रमाणात जोतीबा डोंगराकडे जातात. छोट्या-मोठ्या दुकानांमुळे रस्ता व्यापला आहे. किरकोळ विक्रेत्यांचे जाळे या मार्गावर पसरले आहे. अतिक्रमणामुळे प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

वाहतुकीचा वाढता ताण
अरुंद रस्ते असल्यामुळे जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. मार्गावर वाहनांची कोंडी नित्याचिच आहे. रस्याच्या बाजूपट्या मुरूम टाकून केल्या आहेत. रस्‍त्याला समांतर बाजूपट्या नसल्याने वाहने घसरतात. अवजड वाहनामुळे वाहतुकीची कोंडी होते. साखर कारखान्यांच्या हंगामात वाहतुकीचा प्रचंड ताण असतो.

कोट
रस्त्याच्या दोन्ही बाजुला ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थीत असावी, पुराचे पाणी रस्त्यावर येत असल्यामूळे काही ठिकाणी मोहरीची किंवा रस्त्याची उंची वाढवावी. जेणेकरून पावसाळ्यात रस्ता सुरू राहील. रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ जास्त असल्यामुळे रस्त्याचे रूंदीकरण करावे.
-राजाराम कासार, माजी जि. प. सदस्य

कोट
रस्त्याच्या बाजुला गावाची नावे त्याचबरोबर ज्योतिबा, पन्हाळा यांचे दिशादर्शकि फलक असावेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी ड्रेनेज लाईन असावी. शेतकरी रस्त्यामधूनच खोदकाम करून पाईपलाईन शेतात नेतात. त्यावर वेळीच उपायोजना करणे गरजेचे आहे. रस्त्यावर निवारा शेड, स्वच्छता गृह, पाणी यांची सुविधा करावी.
-सुरेश पाटील, तंटामुक्त अध्यक्ष

कोट
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वारंवार तक्रार करूनही ते मुजवलेले नाहीत. निगवे रोडवरील पुलाचे काम लवकर पूर्ण करावे. रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण राजकीय हस्तक्षेप न होता काढून घेण्याचा प्रयत्न करावा.
-दत्ता चौगले, नागरिक

कोट
एखादा रस्ता तयार केल्यानंतर त्याची जबाबदारी काही महिने किंवा नियमाप्रमाणे ठेकेदाराची असते. लहान-मोठे अपघात होऊ नयेत यासाठी उपाययोजना करावी. .
- कोमल जासुद, सरपंच, निगवे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com