शरद इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

शरद इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

jsp1020
15149
यड्राव : येथे टीई कनेक्टीव्हीटी कंपनीत निवड झालेले शरद इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसोबत अनिल बागणे व ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्राध्यापक.

शरद इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांची निवड
दानोळी, ता. १० ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील आठ विद्यार्थ्यांची जागतीक स्तरावरील टीई कनेक्टीव्हिटी या कंपनीत निवड झाली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सलग सातव्या वर्षी कंपनीने शरद इन्स्टिट्युटमध्ये कॅम्पससाठी येवून विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
श्रीधर मगदूम, वरद जोशी, विश्वजीत टकले, अदित्य थिंगले, अदित्य खाटकोले, स्वप्निल चव्हाण, पल्लवी पाटील, पृथ्वीश कवथे यांची निवड झाली आहे. टीई कनेक्टीव्हिटी आंतरराष्ट्रीय कंपनी असून डिझाईन आणि मॅन्यूफॅक्चरिंग सेंसरचे उत्पादन करते. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्निकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबवले जातात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा सोनी, प्रा. अभिजित केकरे आदींचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com