...तर १४ ऑगस्टपासून धान्य वाटप बंद

...तर १४ ऑगस्टपासून धान्य वाटप बंद

Published on

ajr101.jpg.....
१५२८५
आजरा ः येथील तहसीलदार समिर माने यांना मागण्यांचे निवेदन देताना रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष संजय येसादे व पदाधिकारी.
-----------------------
...तर १४ ऑगस्टपासून धान्य वाटप बंद
रेशन धान्य दुकानदार संघटनेचा इशारा; आजऱ्यात तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १० ः रेशन धान्य दुकानदारांच्या मागण्या अजून सुटलेल्या नाहीत. त्या वेळेत सुटल्या नाहीत तर १४ ऑगस्टपासून आजरा तालुक्यात धान्य वाटप बंद केले जाईल. १५ ऑगस्टला काळ्या फिती बांधून धान्य दुकानदार उपस्थित राहेतील, असा इशारा आजरा तालुका रेशन धान्य दुकानदार संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याच्या तहसीलदारांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, ‘कोरोनात कोणतेही संरक्षण नसतानाही २८ महिने रेशन धान्याचे वाटप केले. या काळातील काही महिन्यांचे कमिशन मिळाले असून बाकी राहिलेल्या महिन्यांच्या कमिशनसह धान्य वाटप व कमिशन रक्कम याचा प्रत्येक दुकानदारांना परिपत्रकानुसार ताबडतोब लेखी हिशेब मिळावा. काही दुकानदारांनी डिसेंबर २०२२ मध्ये चलनासाठी भरलेली लाखोंची रोख रक्कम संबंधित रेशन दुकानदारांना ताबडतोब मिळावी. सेवा सोसायटी, बचत गट, तालुका संघ या संस्थांच्या रेशन दुकानांमध्ये काम करणाऱ्या सेल्समनला कोरोनातील मोफत धान्य वाटपाचे कमिशन मिळावे यासाठी संबंधित संस्थेचे पदाधिकारी, रेशन धान्य दुकानदार संघटनेची समिती यांना बोलावून संयुक्त बैठक बोलवावी. शासन आदेशानुसार डिसेंबर २०२२ पासून आजपर्यंत आठ महिने झाले. विकतचे रेशन धान्य मोफत वाटप करीत आहोत. या काळातील एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही जगावयचे कसे, अशी स्थिती तयार झाली आहे. या मागण्यांबाबत शासनदरबारी चर्चा करून ताबडतोब निर्णय घ्यावा. अन्यथा १४ ऑगस्टला सर्व दुकानदार धान्य वाटपाचे काम बंद करणार आहेत. ध्वजवंदनाला काळ्या फिती लावून उपस्थित राहणार आहोत.’ रेशन धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय येसादे व पदाधिकारी यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.