डॉ. उबाळे यांनी स्वीकारला ‘सहसंचालक’पदाचा कार्यभार

डॉ. उबाळे यांनी स्वीकारला ‘सहसंचालक’पदाचा कार्यभार

Published on

डॉ. उबाळे यांनी स्वीकारला
‘सहसंचालक’पदाचा कार्यभार

कोल्हापूर ः येथील कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार प्रा. डॉ. अशोक उबाळे यांनी सोमवारी स्वीकारला. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर विभागात डिसेंबर २०१९ ते जुलै २०२१ दरम्यान या पदाची जबाबदारी सांभाळली आहे. लाचखोरीप्रकरणी डॉ. हेमंत कठरे याच्यासह स्टेनोग्राफर प्रवीण गुरव, कनिष्ठ लिपिक अनिल जोंग यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने डॉ. उबाळे यांच्याकडे सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. त्यांनी सोमवारी दुपारी कार्यभार स्वीकारला. ‘या विभागीय कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न माझा राहील. प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाईल’, असे डॉ. उबाळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.