मनापाची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज

मनापाची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज

ich104.jpg
15288
इचलकरंजी ः आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांनी यांत्रिक बोटीतून पंचगंगा नदीतील संभाव्य पूरस्थीतीचा आढावा घेतला. (अमर चिंदे ः सकाळ छायाचित्रसेवा)
--------
मनापाची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज
ओमप्रकाश दिवटे; इचलकरंजीत आपत्कालीन प्रात्यक्षिके
इचलकरंजी, ता.10 ः पंचगगा नदीतील संभाव्य महापूरासह अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी इचलकरंजी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज आहे, अशी माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आज दिली.
कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरामध्ये मागील काही वर्षात महापूर आला होता. त्याचा मोठा फटका सर्व घटकांना बसला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार संभाव्य महापूर तसेच अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी इचलकरंजी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा आतापासूनच सतर्क करण्यात आली आहे. त्यानुसार पंचगंगा नदीघाट येथे आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्यांचे प्रात्यक्षिक घेतले. यामध्ये नव्याने खरेदी केलेल्या फ्लोटिंग डॉक बोटीचे पूजन आयुक्त दिवटे यांच्याहस्ते केले.
यावेळी मनपाच्या आपत्कालीन विभागाकडे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीची सविस्तर माहिती विभागप्रमुख संजय कांबळे यांनी प्रात्यक्षिकासह दिली. यामध्ये यांत्रिक बोट, साधी फायबर बोट, स्टिल कटर, वुड कटर, लाईफ जॅकेट, रिफ्लेक्टीव्ह जॅकेट, लाईफ रिंग, दोर, मेगा फोन, गळ, ट्यूब, इमर्जन्सी लॅम्प, स्नेक हँगर, टॉर्च, स्लायडिंग शिडी, बायनाक्युलर आदी साहित्य तसेच फायर बुलेट, फायर फायटर, रुग्णवाहिका, हायड्रोलिक प्लॅटफार्म, औषध फवारणी ट्रॅक्टर, सक्शन ट्रॅक्टर याचा समावेश आहे. आयुक्त दिवटे यांनी या साहित्यांची माहिती घेतली. त्यानंतर महापूराची परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी त्याचे अचूक नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासह अन्य अधिका-यांनी बोटीतून पंचगंगा नदीच्या संभाव्य पूरस्थीतीची पाहणी केली.
याप्रसंगी उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त केतन गुजर, शहर अभियंता संजय बागडे, उप अभियंता सुभाष देशपांडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, लेखापरीक्षक दिलीप हराळे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, वाहन अधिक्षक राजेंद्र मिरगे, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, अभय शिरोलीकर, बाजी कांबळे, उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, महाराष्ट्र सुरक्षा बल पर्यवेक्षक उमाजी कणसे, स्वच्छता निरीक्षक सुरज माळगे, वरद विनायक बोट क्लबचे गणेश बरगाले, व्हाईट आर्मीचे शाहीर जावळे, तेजोनिधी रेस्क्यू फोर्स, पोलिस बॉईजचे सदस्य उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com