चित्रनगरी बैठक

चित्रनगरी बैठक

Published on

15335
...

कोल्हापूर चित्रनगरीत
तत्काळ अद्ययावत सुविधा

मुंबईतील बैठकीत निर्णय, लवकरच विविध कामांसाठी निविदा


कोल्हापूर, ता. १० ः येथील चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी लागणाऱ्या अद्ययावत सोयी -सुविधांची निर्मिती व त्यासाठीच्या निर्णयांची अंमलबजावणी आता लवकरच होणार आहे. विविध कामांसाठीच्या निविदा येत्या महिन्याभरात निघणार असून ही सर्व कामे मेअखेर पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबईत आज झालेल्या बैठकीत हे निर्णय झाले. चित्रनगरीत तातडीने विविध सुविधा द्या, अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार आज ही बैठक झाली.
बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून होत असलेल्या कार्यवाहीचे सादरीकरण झाले. ४५ कोटी निधीतून होणाऱ्या या कामांमध्ये चित्रीकरणासाठी नवीन बंगला, तीन वसतीगृहे, अद्ययावत रेल्वेस्थानक व दोन नवीन स्टुडिओ या चित्रीकरणस्थळांचा समावेश आहे. टॉक शोसाठी ध्वनी व अग्निशामक योजना उभारणे, अंतर्गत रस्ते व पथदिवे बसविणे, राष्ट्रीय महामार्गालगतच्या भूखंडाला संरक्षण भिंत बांधकाम, एमआयडीसीकडून पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकणे, सबस्टेशनपासून विविध चित्रीकरणाच्या स्थळापर्यंत वीजपुरवठ्यासाठी इलेक्ट्रिक केबल टाकणे, चित्रीकरणाकरीता चाळीचे बांधकाम, तंत्रज्ञान व सहकालाकारांसाठी २० खोल्यांचे वसतिगृह, मंदिराचे बांधकाम व वाड्याचे नव्याने बांधकाम आदी कामांचा समावेश आहे.
दरम्यान, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान विकास खारगे, उपसचिव विलास थोरात व श्रीमती विद्या वाघमारे, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, कलादिग्दर्शक संतोष फुटाणे, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदीगरे, वास्तु विशारद इंद्रजीत नागेशकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.