आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

15317
कोल्हापूर ः महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जोतिबा डोंगर येथे वृक्षारोपण झाले.

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण
कोल्हापूर ः महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जोतिबा डोंगरावर नुकतेच वृक्षारोपण झाले. पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण सचिनदाद धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. साडेचारशेहून अधिक स्वयंसेवकांनी साडेआठशेहून अधिक झाडे लावली. प्रतिष्ठानतर्फे सामाजिक बांधिलकीतून वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आपत्तीग्रस्तांना मदत, स्मशानभूमी नूतनीकरण, तलाव-विहिरीतील गाळ काढणे, वनराई बंधारे बांधणे, जल पुनर्भरण, निर्माल्य संकलन आदी उपक्रम राबवले जातात.
------------
छायावृत्त
15325
कोल्हापूर ः येथील साईसमर्थ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गरजूंसाठी अन्नछत्र उपक्रमाला प्रारंभ झाला. या वेळी दादासाहेब मगदूम विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण झाले. शाहूपुरी व्यापारी पेठेत अन्नदान उपक्रम होत असून या उपक्रमात जास्तीत जास्त कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमर समर्थ, ज्योती खामकर यांनी केले आहे.
-------------
१५३३३
अनिरूध्द कुलकर्णी
अनिरूध्द कुलकर्णी यांचे यश
कोल्हापूर ः दि इन्‍स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाने घेतलेल्या सीए परीक्षेत येथील अनिरूध्द प्रमोद कुलकर्णी उत्तीर्ण झाले. त्यांना सीए राजेश लोहिया यांचे मार्गदर्शन लाभले.
-----------
15319
स्वरा भेडसगावकर

स्वरा भेडसगावकरला सुवर्ण
कोल्हापूर ः सातारा येथील समर्थ विद्यापीठातर्फे आयोजित दासबोध परीक्षेत प्रायव्हेट हायस्कूलच्या स्वरा भेडसगावकरने सुवर्णपदक पटकावले. तिला संस्कृतविभाग प्रमुख जे. एस. जोशी, मुख्याध्यापिका व्ही. एल. डेळेकर, उपमुख्याध्यापक जी. एस. जांभळीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
------------
हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद
कोल्हापूर ः गायक परिवार, स्वरसंगम ॲकॅडमी, हनुमाननगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नुकताच मोफत हिंदी गाण्यांचा कार्यक्रम झाला. विजयकुमार बनगे, डॉ. राजकुमार पोळ, उदयकुमार भट, संजय कुलकर्णी, पद्मजा पाटील, शकुंतला चौगले, रघुनाथ लष्करे, शकुंतला मोरे, वृषाली शिंदे, स्मिता हळदे आदींनी गीते सादर केली. यावेळी प्रकाश हाळवे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष शिवाजीराव हिलगे यांनी आभार मानले. श्रृती इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब साळोखे, शामराव पाटील, शदर कारखानीस आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com