२२५ वाहनचालकांवर कारवाई

२२५ वाहनचालकांवर कारवाई

15312
२२५ वाहनचालकांवर कारवाई
नियमांचे उल्लंघन ; दिवसात ९१ हजारांचा दंड वसूल

कोल्‍हापूर, ता. १० - वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २२५ वाहनचालकांवर कारवाई करून १ लाख ३४ हजार २०० रुपये दंडांची कारवाई करण्यात आली. त्यापैकी ९१ हजार रुपयांचा दंड वसुल झाला आहे. एकाच दिवसात विशेष मोहिम राबवून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.
शहरात काही वाहनधारक वाहने भरधाव वेगाने चालवतात. वाहनांना कर्णकर्कश हॉर्न आहेत. दिवस-रात्रीत वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नचा वापर होतो. काही वाहनधारकांनी विहित नमुन्यात नंबर प्लेट न लावता फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्याचे आजच्या मोहिमेत निदर्शनास आले.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आणि उपअधीक्षक अजित टिके यांचे मार्गदर्शखाली आज दिवसभरात ही कारवाई करण्यात आली. अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले.
-------------
या कारणावरून झाली कारवाई - आकडे
कर्णकर्कश हॉर्न - १८
विनानंबरप्लेट वाहने -७४
नंबरप्लेट विहीत नमुन्यात नसणे - ६
परवाना जवळ न बाळगणे - ५६
अनधिकृत बदल (सायलेंसर रंग इ.)- १
वाहन चालविताना मोबाईलचा वापर - २
रहदारीस अडथळा ठरणे - १४
ट्रिपल सीट - ६
दारू पिऊन वाहन चालविणे - १
इतर कारवाई - ४७
एकूण कारवाई २२५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com