सम्राटनगरमध्ये व्यापारी जखमी

सम्राटनगरमध्ये व्यापारी जखमी

Published on

चाकूहल्ल्यात व्यापारी जखमी

कोल्हापूर : सम्राटनगरमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात एक व्यापारी जखमी झाला. याबाबत संशयित हल्लेखोराविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरासमोरील मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशनास विरोध केल्याने मद्यधुंद अवस्थेतील दोघांनी केलेल्या चाकूहल्ल्यात अश्‍विनी नगर, सम्राट नगर येथील व्यापारी नवीन प्रविणकुमार अग्रवाल (वय ३७) हे जखमी झाले. हल्ल्यानंतर संशयितांनी घटनास्थळी दुचाकी सोडून पलायन केले. जखमी अग्रवाल यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिस निरिक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.