‘एमआर’ला साकारणार फळांची बाग

‘एमआर’ला साकारणार फळांची बाग

gad117.jpg
15432
गडहिंग्लज : एम आर प्रशालेत साकारणाऱ्या फळबागेत विद्यार्थ्यांनी खड्डे खणून परिसराची स्वच्छता केली. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
---------------------------------
‘एमआर’ला साकारणार फळांची बाग
शतकमहोत्सवी प्रशाला; विद्यार्थी घेणार संवर्धनासाठी शंभर झाडे दत्तक
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : येथील जिल्हा परिषदेच्या महाराणी राधाबाई (एम. आर.) हायस्कुलमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रयत्नातून फळांची बाग साकारणार आहे. प्रशालेच्या शतक महोत्सवानिमित्त आंबा, चिकू, फणस, शेवगा, लिंबू यांची शंभर झाडे आणि भाजीपाला मुख्य इमारतीच्या लगतच्या जागेत लावण्यात येणार आहे. महिनाभऱ यासाठी खड्डे काढून विद्यार्थ्यांनी परिसराची सफाई केली. प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड संगोपनासाठी दत्तक दिले जाणार आहे.
तालुक्यातीलच नव्हे तर गडहिंग्लज उपविभागातील ‘एमआर’ हायस्कुल ही सर्वात जुनी शाळा होय. आश्रयदाते छत्रपती शाहू महाराजांच्या बहिणीच्या नावाने या प्रशालेने शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली आहे. दर्जेदार शिक्षणामुळे दहावी, बारावी शंभर टक्के निकालाची उत्कृष्ठ परंपरा कायम आहे. क्रीडाक्षेत्रातही शेकडो खेळाडू घडवणाऱ्या या प्रशालेला नजरेत भरणारे मैदान आणि इमारत लाभली आहे. शाळेचे हजारो माजी विद्यार्थी देश, विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. अलिकडे खासगी शाळांच्या स्पर्धेमुळे हायस्कुलचा पट घसरला होता. यंदा सेमी इंग्लिशमुळे विद्यार्थी संख्येला पालवी फुटून ‘सेंच्युरी’ गाठत भरारी घेतली आहे.
शतक महोत्सवी वर्षात प्रशालेने जणू कात टाकली आहे. माजी वद्यार्थी संघटनेने विदयार्थ्यांच्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. प्रशालेचे प्राचार्य संजय कुंभार यांच्या संकल्पनेतून ही फळबाग साकारत आहे. विद्यार्थ्यांचा पर्यावरणाशी स्नेह वाढावा असाच फळबागेचा उद्देश आहे. फळबागेशेजारी भाजीपालाही लावला जाणार आहे. त्यासाठी नांगरणी केली आहे. झाडांसाठी खड्डे खणले आहेत. यासाठी महिनाभर शिक्षक आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. बागेतील झाडांची शंभर विद्यार्थ्यांवर संवर्धनाची जवाबदारी दिली आहे. पिकणारा भाजीपाला पोषण आहारात वापरला जाणार आहे.
--------------
शेतीची पंरपंरा
प्रशालेत स्थापनेपासून (१९२३) शेती विषय शिकवला जात होता. ऐंशीच्या दशकात हा विषय बंद झाला. प्रशालेच्या यापुर्वीच्या सर्वच शिक्षकांनी वृक्ष संर्वधनाला महत्व दिल्याने शाळेचा परिसर झाडांनी बहरलेला आहे. दोन दशकांपूर्वी तत्कालिन मुख्याध्यापक ए. एन. पवार यांनी पुढाकार घेऊन वड, पिंपळ, लिंब, सागवान यांची १५० हून अधिक झाडे लावून मोठी केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com