कराओके ट्रॅकवर सजली मैफिल

कराओके ट्रॅकवर सजली मैफिल

Published on

कराओके ट्रॅकवर
सजली गीत मैफल
कोल्हापूर, ता. ११ ः येथील उमा टॉकीज चौकात सुरू झालेल्या अमित जाधव यांच्या रॉयल आर्ट कराओके स्टुडिओ तर्फे केशवराव भोसले नाट्यगृह येथे म्युझिकल फ्युजन गीत मैफल सजली. मार्गेश पाटील यांनी संयोजन केले. बालकलाकार ईश्वरी शिंदे हिच्या गणेश वंदनेने मैफलीची सुरुवात झाली. कबीर नाईकनवरे व सई लकडे द्वंद्व गीत, मिमिक्री आर्टिस्ट पी. कुमार यांचे सादरीकरण, प्रकाश साळोखे, वंदना साळोखे व अशोक साळोखे यांचा सॅक्सोफोनचा आविष्कार यांच्या सादरीकरणातून मैफलीची रंगत आणखी वाढली.
नृत्यांगणा सान्वी बासरानीने नृत्याच्या तालावर नाचत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. रॉयल आर्च कराओके स्टुडिओचे हौशी गायक कलाकार दिलीप साळोखे, राजेंद्र रावराणे, राजाराम खटावकर, अशोक भोरे (पुजारी), राजेंद्र तामगावकर, डॉ. उज्ज्वला कांबळे, डॉ. अनिता परितेकर, श्रीनिवास कलबुर्गी, वसीम मुजावर, संतोष पाटील, युवराज दामुगडे, चांद आत्तार, हेमंत पोळ, राजेंद्र माने, चारुदत्त रणदिवे, मोनिका बकरे, पूनम थोरात, स्वाती जोशी, अंजली कोठारी, अर्चना बकरे, अंजली दुर्गाई यांनी गीते गायली. सागर पाटील व करमणूक विभागप्रमुख गौरी प्रसाद संगोळी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण रणदिवे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.