मोहरम बैठक

मोहरम बैठक

15504
...

पारंपरिक वाद्यांच्या गजरातच मोहरम

संयुक्त बैठकीत सूचना ः साऊंड, लेसर शोला फाटा देण्याचे आवाहन

कोल्हापूर, ता. ११ ः हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला मोहरमचा सण अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. सणाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम धर्मीयांतील सलोखा आणखी घट्ट व्हावा, पंजेभेटी, विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचाच वापर व्हावा, साऊंड-लेसर शोला फाटा द्यावा, अशा विविध सूचना आज मांडण्यात आल्या. पोलिस प्रशासन आणि मोहरम उत्सव समितीची संयुक्त बैठक लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली. यावेळी या सूचना मांडण्यात आला. शहरातील पंजे प्रतिष्ठापना करणाऱ्या तालमी, मंडळे आणि कुटुंबातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
...

रात्री दहाला साऊंड बंद

पंजेभेटी, विसर्जन मिरवणुकीसाठी कुणी साऊंड सिस्टीम लावल्याच तर रात्री दहाला त्या बंद केल्या जातील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे नोंद केले जातील. त्यामुळे उत्सव भक्तिपूर्ण वातावरणातच करावा. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले. दरम्यान, यावेळी लक्ष्मीपुरीचे निरीक्षक अविनाश कवठेकर, जुना राजवाडाचे निरीक्षक सतीशकुमार गुरव, राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे, वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे यावेळी उपस्थित होते.
......

राजर्षी शाहूंची परंपरा जपूया...

हिंदू- मुस्लिम ऐक्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी या सणाला प्रोत्साहन दिले. हीच परंपरा अधिक नेटाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त झाला. पंजेभेटी व विसर्जनावेळी वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. विसर्जन मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवावी, अशा सूचनाही यावेळी मांडण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com