काळामवाडी सोसायटी अध्यक्ष-उपाध्यक्षाविरुद्ध अविश्‍वास ठराव

काळामवाडी सोसायटी अध्यक्ष-उपाध्यक्षाविरुद्ध अविश्‍वास ठराव

काळामवाडी सोसायटी अध्यक्ष-
उपाध्यक्षाविरुद्ध अविश्‍वास ठराव
गडहिंग्लज, ता. ११ : काळामवाडी (ता. गडहिंग्लज) येथील महालक्ष्मी विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुभाष पोवार व उपाध्यक्ष जोतिबा लांडे यांच्याविरोधात सात संचालकांनी सहायक निबंधकांकडे आज अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. दरम्यान, याबाबत अध्यक्ष पोवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
संचालक सरीता हेळवाडकर, दशरथ पाटील, मारुती लांडे, विठ्ठल हेळवाडकर, कृष्णा पाटील, अर्जून हेळवाडकर, दुर्गाप्पा कांबळे या सात संचालकांनी हा ठराव दाखल आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष हे संचालकांना विश्‍वासात न घेता कारभार करतात, संचालकांना कोणतीही माहिती देत नाहीत, त्यांच्या मनमानी कारभारामुळे संस्थेचे स्थैर्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. संचालक व सभासदांचा विश्‍वास गमावला असून त्यांना पदावरुन दूर करावे, अशी मागणी या ठरावातून सात संचालकांनी केली आहे. ठरावाच्या सूचक सरीता हेळवाडकर असून दशरथ पाटील अनुमोदक आहेत, अशी माहिती परशराम हेळवाडकर यांनी प्रसिद्धीला दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com