महापालिका

महापालिका

Published on

शिक्षण समितीवर
कारवाई करा
कृती समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : महापालिकेच्या शिक्षण समितीचा कार्यभार आरटीई कायद्यानुसार आयुक्तांच्या अधिकारात चालतो. मात्र, कोल्हापूर महापालिका शिक्षण समितीने चार शैक्षणिक पर्यवेक्षक पदे मंजूर असताना गेली सहा वर्षे एकाही पर्यवेक्षकाची नेमणूक केलेली नाही. नियुक्तीविना काहीजण निवृत्तही झाले आहेत. याबाबत तत्काळ शिक्षण समितीवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पालकमंत्री दीपक केसरकर यांना पाठवले आहे.
या पत्रात म्हटले आहे, शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच सप्टेंबरला शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. मात्र, चार वर्षे हा कार्यक्रमच झालेला नाही. २०२१ आणि २०२२ सालच्या पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली; पण अद्याप वितरण झालेले नाही. पुरस्कारप्राप्त काही शिक्षकही आता निवृत्त झाले आहेत. बदल्यांची प्रक्रियाही गेली दोन वर्षे वेळेत झालेली नाही. मोठ्या खासगी व महापालिका शाळेत मंजूर तुकड्यांपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्या ठिकाणी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध नसताना मनमानी प्रवेश दिला गेला आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण समितीवर कारवाई करावी. अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, राजाभाऊ मालेकर, विनोद डुणूंग, लहूजी शिंदे, महादेव पाटील, महेश जाधव, शंकरराव शेळके, चंद्रकांत पाटील, प्रकाश आमटे, प्रसाद बुलबुले, अमित मोहिते, महादेव जाधव, बाबा वाघापूरकर, रमेश पोवार, अजित सासणे आदींच्या या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.
----------------
१५५५०
कोल्हापूर : रूईकर कॉलनी येथील हिंद विद्यालयामागील धोकादायक इमारत बांधकामावर विभागीय कार्यालयाकडून मंगळवारी कारवाई झाली. धोकादायक बांधकाम पाडण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.