वस्त्रनगरी होणार पुन्हा ‘सेफसिटी’

वस्त्रनगरी होणार पुन्हा ‘सेफसिटी’

ich116.jpg
15551
इचलकरंजी ः सेफ सिटी अंतर्गत बसवलेले सीसीटीव्ही दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (अमर चिंदे ः सकाळ छायाचित्रसेवा)

वस्त्रनगरी होणार पुन्हा ‘सेफसिटी’
बंद पडलेल्या ‘सीसीटीव्ही’ची दुरुस्ती सुरू ः महिनाभरात सर्व कॅमेरे होणार कार्यान्वित

इचलकरंजी, ता. ११ ः शहरामध्ये सेफसिटी अंतर्गत उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे शहराच्या सुरक्षिततेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेला हा तिसरा डोळा कमकुवत झाला होता. आता मात्र पुन्हा एकदा बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या महिन्याभरात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत सुरू राहणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शहराच्या सुरक्षिततेमध्ये या ‘सीसीटीव्ही’ची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी, चोरीच्या घटनांना आळा घालण्यासह शहरातील नागरिकांचा सुरक्षिततेसाठी सेफसिटी अंतर्गत दोन टप्प्यात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसवले. एकूण २४८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले होते. तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला होता. मात्र, कालांतराने याच्या देखभाल दुरुस्तीचा वाद निर्माण झाला. यातील अनेक कॅमेरे बंद पडले. त्यामुळे शहरातील विविध गुन्ह्यांचा तपास करताना अडथळा येऊ लागला. वाहन चोरीसह विविध गंभीर गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणेला खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्याची वेळ आली. मात्र, पुन्हा एकदा पोलिस दलाकडून सीसीटीव्ही दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. काही दिवसांपासून ही मोहीम सुरू केली आहे. येत्या महिनाभरात ही मोहीम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली शहर व परिसर राहणार आहे.
------
वेळीच देखभाल दुरुस्तीची गरज
विविध गुन्ह्यांची उखल करताना सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची ठरते; पण त्याकडेच दुर्लक्ष केले होते. परिणामी, सेफसिटी प्रकल्प असतानाही शहर असुरक्षित बनत चालले होते. योग्यवेळी देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे एकवेळ केवळ २९ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते. त्यानंतर पुन्हा त्यांची दुरुस्ती करीत ही संख्या १८१ पर्यंत पोहोचली होती; पण वादळी वारे, पाऊस यामध्ये पुन्हा अडथळा निर्माण झाला. सध्या १६२ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com