पाऊस बातमी

पाऊस बातमी

शहरासह ग्रामीण भागात पावसाची ओढ


कोल्हापूर, ता. ११ ः शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आज पावसाने ओढ दिली. तुरळक सरींचा अपवाद वगळता पाऊस पडला नाही. अशीच परिस्थिती राहिली तर पेरणी केलेल्या बियाणांच्या उगवणीलाही विलंब होईल, अशी भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पंचगंगा नदीची पाणीपातळी आज रात्री ९ वाजता १६ फूट ३ इंच इतकी होती.
जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वरुणराजाचे आगमन लांबले. त्यामुळे उपसाबंदीला सामोरे जावे लागले. गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात मान्सून सक्रीय झाला. सुरुवातीला धरणक्षेत्रात दमदार पाऊस बरसला. मात्र गेल्या दोन दिवसांत पावसाने ओढ दिली आहे. धरणक्षेत्रातही अपेक्षित पाऊस झालेला नाही. धरणातील पाणी साठा वाढत आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ३३८ मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र तो १२४ मिमी इतकाच झाला आहे.
भुदरगड तालुक्यातील कुर, मिणचे, हेदवडेसह परिसरात गेली चार दिवस पावसाची उघडझाप सुरू आहे. अधूनमधून तुरळक सरी कोसळत होत्या, पण पावसाचा जोर कमी झाला आहे. फये लघु पाटबंधारे प्रकल्प परिसरात पाऊस कमी झाला असून, वेदगंगा नदीची पाण्याची पातळी हळूहळू कमी होत आहे.
---
धरणातील पाणीसाठा (टीएमसी)
राधानगरी - ३.४०
तुळशी - ०.९५
वारणा - १३.१६
दुधगंगा - ३.९६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com