संकेश्‍वरी मिरची जीआय

संकेश्‍वरी मिरची जीआय

(18 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या बिग स्टोरीची इमेज वापरावी)
---

''संकेश्‍वरी''च्या ''जीआय'' ब्रॅण्डसाठी घेणार पुढाकार

गडहिंग्लज- आजऱ्या‍ची जवारी मिरची : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेमुळे ‘कृषी’ च्या हालचाली

अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. १२ : राज्यातील मेट्रो सिटीसह महत्वाच्या शहरांमध्ये चव आणि तिखटाने खवय्यांवर भुरळ घातलेल्या संकेश्‍वरी (जवारी) मिरचीला जी.आय. मानांकन मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राहुल रेखावार यांनी एका बैठकीत विशेष सूचना दिल्याने कृषी विभागाच्या हालचाली वाढल्या आहेत. गडहिंग्लज आणि आजऱ्या‍तील काही गावांमध्ये उत्पादित होणाऱ्या‍ या मिरचीला ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. रेखावार यांच्या उपस्थितीत आत्मा योजनेच्या आढावासाठी नुकतीच बैठक झाली. त्यामध्येच संकेश्‍वरी मिरचीच्या जी.आय. मानांकनाबाबत चर्चा झाली. त्यावेळी कृषी विभागाने मिरचीला मानांकन मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे आता कृषी विभागाकडून हालचाली वेगावल्या आहेत. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी विनायक देशमुख यांचीही उपस्थिती होती.
अनेक वर्षांपासून खवय्यांमध्ये संकेश्‍वरी मिरचीचा करिष्मा कायम आहे. महाराष्ट्रात या मिरचीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडहिंग्लजमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अडत दुकानांतील सौद्यांतून दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल होते. या मिरचीला कोकण, गोवा, राज्यातील मुंबई, पुण्यासह बहुतांश मेट्रो सिटीमध्ये या मिरचीच्या चटकदार चवीने व झणझणीत तिखटाने भुरळ घातली आहे. मिरचीचे उत्पादन सध्या कमी असले तरी ती दर्जेदार असल्याने प्रति किलो १ ते २ हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे. यावरुनच मिरचीचा दर्जा लक्षात येतो. म्हणूनच या मिरचीला जी. आय. मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यां‍नीच सूचना दिल्याने कृषी विभागाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
...

चौकट..

* या गावात होते उत्पादन

माद्याळ, कसबा नूल, औरनाळ, बसर्गे, हलकर्णी, खणदाळ, शेंद्री, हनिमनाळ, निलजी, हेब्बाळ (ता. गडहिंग्लज), बहिरेवाडी, आर्दाळ, सुळे, लाकूडवाडी, मुमेवाडी (ता. आजरा) आदी गावांमध्ये साधारण ३०० एकरापर्यंत या मिरचीची लागवड होते.

* ‘संकेश्‍वरी’ प्रकल्प अहवाल
तत्कालीन उपविभागीय अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी संकेश्‍वरी मिरची उत्पादकांचा गट, क्षेत्र विस्तार, लागवडीची माहिती, प्रशिक्षण, अभ्यास दौरा, रोपवाटीका, सेंद्रीय निविष्ठा उत्पादन, पिक प्रात्यक्षिक, प्रक्रिया युनिटद्वारे उत्पादनात वाढ, या मिरचीचे ब्रॅण्डींग या अनुषंगाने प्रकल्प अहवाल तयार केला आहे. आता जीआयच्या दृष्टीने कृषी विभागाकडून क्षेत्र, उत्पादक शेतकरी नोंदणीची सुरुवात होणार आहे.

* ‘सकाळ’चा पाठपुरावा
गडहिंग्लज व आजरा परिसरात प्रसिद्ध असलेल्या मिरचीला मार्केट उपलब्ध होण्यासाठी दै. ‘सकाळ’ने नेहमीच पाठपुरावा केला आहे. तसेच ‘संकेश्‍वरी मिरचीचा ब्रॅण्ड व्हावा’ या मथळ्याखाली ’सकाळ’ने बिग स्टोरीच्या माध्यमातून मिरचीच्या इतिहासापासून त्याच्या गुणधर्माची मांडणी केली होती. त्यानंतरही सातत्याने या मिरचीच्या ब्रॅण्डींगसाठी बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहे.
...

कोट...
‘संकेश्‍वरी मिरचीची जात मूळची कर्नाटकची आहे. यामुळे महाराष्ट्रातून जी.आय. मानांकन मिळवण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येणार आहेत. मिरचीचा इतिहास समजून घेण्यासाठी कर्नाटकच्या धारवाड संशोधन केंद्राला भेट द्यावी लागेल. त्या संशोधन केंद्राकडून जी.आय.साठी सहकार्य मिळवण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करणार आहे.
- विनायक देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी,
- अनिल फोंडे, तालुका कृषी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com