भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर आयुक्तांशी चर्चा

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर आयुक्तांशी चर्चा

ich174.jpg
इचलकरंजी ः भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याशी चर्चा करताना काँग्रेसचे शिष्टमंडळ.
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर आयुक्तांशी चर्चा
इचलकरंजी, ता. १८ ः भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या व त्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेवून अधिक प्रभावीपणे निर्बिजिकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. भटकी कुत्री हिंस्त्र होण्याचे प्रमुख कारण असलेले चिकन ६५ खाद्य पदार्थाच्या ठिकाणांची माहिती घेवून संबंधितावर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. याप्रश्नाबाबत शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेवून चर्चा केली. एक महिन्यांपूर्वी याबाबतचे निवेदन दिले होते. त्यावर कोणती कार्यवाही केली. याचीही विचारणा केली. प्रदेश सचिव शशांक बावचकर यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात बाबासाहेब कोतवाल, प्रमोद खुडे, बिस्मील्ला गैबान, रवी वासुदेव, ओंकार आवळकर, रविराज पाटील, दिलीप पाटील, योगेश कांबळे आदींचा समावेश होता.
----------
महिन्यातून एकदा स्वच्छता मोहिम राबवा
इचलकरंजी, ता. १८ ः विभागप्रमुखांनी आपल्या कार्यालयात किमान महिन्यातून एकदा तरी स्वच्छता मोहिम राबवावी, अशी सूचना आयक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केली. महापालिका सभागृहात विभागप्रमुखांची बैठक त्यांनी घेतली. तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रशासकीय शिस्तीबाबत घेतलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी यांनी मागणी केलेल्या विविध कामांची कार्यवाही वेळेत करावी, शासन स्तरावरुन निर्देशीत करण्यात येणारे प्रस्ताव वेळेत सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. शहरवासियांच्या आयुष्यात सुखावह बदल झाल्याची भावना निर्माण झाली पाहिजे, असे प्रशासकीय कामकाज ठेवूया, असे आवाहनही त्यांनी केले. उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल उपस्थित होते.
----------
ich175.jpg
16797
इचलकरंजी ः आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना निवेदन देतांना शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे.
सुविधा नसताना ड्रेनेज
कर आकरणीची तक्रार
इचलकरंजी, ता. १८ ः ड्रेनेजची सुविधा नसताना महापालिकेच्या कर विभागाकडून ड्रेनेज कराची आकारणी केली आहे. याबाबत शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना निवेदन देवून घरफाळा बिलातून ड्रेनेज कर वगळण्याची मागणी केली होती. शहापूर, कबनूरचा वाढीव भाग या परिसरात ड्रेनेजची सुविधा अद्याप दिलेली नाही. मात्र या परिसरातील मिळकतधारकांना ड्रेनेज कराची आकारणी झाली आहे. जोपर्यंत ही सुविधा दिली जात नाही, तोपर्यंत या कराची आकारणी करु नये, अशी मागणी आवळे यांनी निवेदनात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com