बातमी

बातमी

Published on

17101
मौजे खुपीरे (ता. करवीर) : येथे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरण करताना कृषी अधिकारी.

मौजे खुपीरेत पिक विम्यासाठी कॅम्प
कोल्हापूर, ता. १८ : मौजे खुपीरे (ता. करवीर) येथे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत केवळ एक रुपयामध्ये पिक विमा योजनेचा विशेष कॅम्प आयोजित केला होता. यात ४० शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज भरले.
मंडळ कृषी अधिकारी मोहिणी वाळेकर, संतोष पाटील, कृषी पर्यवेक्षक कृषि सहाय्यक संतोष मोरे यासह सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज भरून घेतले. या वेळी जिल्हा अमित चव्हाण, रणजीत पाटील, विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. शासनाने सन २०२३-२४ पासून एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना राबवत असून या अंतर्गत, भात, भुईमुंग, सोयाबीन, नाचणी, ज्वारीव इतर पिकांचा समावेश आहे. योजना शेतकऱ्यांना ऐच्छीक असून आपले सरकार केंद्र येथे सर्व शेतकऱ्यांना पिकाचा विमा उतरून घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
या कॅम्पसाठी तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.