सरोज चषक

सरोज चषक

Published on

17039
कोल्हापूर ः सरोज चषक वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी महिलांसोबत परीक्षक व संस्थेच्या पदाधिकारी.

श्रृती पाटील सरोज चषकाच्या मानकरी
कोल्हापूर, ता. १८ ः सरोजिनीदेवी विश्‍वनाथ पाटील तथा काकीजी यांच्या ५४ व्या स्मृतिदिनानिमित्त शेतकरी महिलांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत श्रृती संदीप पाटील (आंबा) यांनी सरोज चषक पटकावला, तर सारिका बाबासाहेब जठार (जठारवाडी) यांनी द्वितीय व वैशाली बाळासो हावळे (आळते) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. कै. नलिनी माधवराव देशपांडे (आजरा) यांनी रोख बक्षिसाचे प्रायोजकत्व स्वीकारले. प्रमोद पाटील, शंकरराव माळी, प्रकाश कुलकर्णी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. अध्यक्षा जयश्री गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. संचालिका कविता देसाई, दीपलक्ष्मी राऊत यांनी परीक्षकांचे स्वागत केले. वैशाली चौगुले यांनी सरोजिनीदेवी पाटील यांच्याविषयी माहिती दिली. अंजली घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी स्वयंसिद्धाच्या कार्यकारी संचालिका तृप्ती पुरेकर, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या तिरोडकर, स्वयंप्रेरिका संस्थेच्या सचिव कविता बडे उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.