सौरछत

सौरछत

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील
९०६ घरगुती ग्राहकांनी घेतला लाभ

सौरछत ४० टक्के अनुदान योजना

कोल्हापूर, ता. १८ : महावितरणच्या सौरछतासाठीच्या ४० टक्के अनुदान योजनेंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ९०६ घरगुती ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्यांनी छतावर ३४८३ किलोवॉट क्षमतेची सौर यंत्रणा बसविली आहे. ६०३ ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारची ही योजना आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ६१३ (२४५० किलोवॉट), तर सांगली जिल्ह्यातील २९३ (१०३३ किलोवॉट) घरगुती ग्राहकांनी सौरछत यंत्रणा बसविली आहे. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या योजनेतून घरगुती ग्राहकांना १ ते ३ किलोवॉटपर्यंत सौरछत संचास ४० टक्के, तर पुढील ३ पेक्षा अधिक ते १० किलोवॉटपर्यंत २० टक्के अनुदान आहे. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॉटपर्यंत मात्र प्रत्येक घरासाठी १० किलोवॉट मर्यादेत समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान आहे. योजनेची माहिती https://www.mahadiscom.in/ismart/ लिंकवर उपलब्ध आहे.
१ किलोवॉट क्षमतेची सोलर रुफ टॉप यंत्रणा बसविण्यासाठी साधारणपणे १०८ स्क्वेअर फूट, जिथे सावली पडत नाही, अशी जागा आवश्यक आहे.

चौकट
२ कोटी ४४ लाख युनिटची
एप्रिलमध्ये वीज निर्मिती
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत विविध वर्गवारीतील ५ हजार १२६ ग्राहकांनी अनुदानित व विनाअनुदानित तत्वावर छतावर ८५ हजार किलोवॉट क्षमतेची सौर यंत्रणा बसवली आहे. सौरछताद्वारे एप्रिलमध्ये २ कोटी ४४ लाख युनिट वीज निर्मिती केली. मेमध्ये १ कोटी ७० लाख युनिट, तर जूनमध्ये १ कोटी १५ लाख युनिट वीज निर्मिती केली. सांगली जिल्ह्यातील सौरछत ग्राहकांनी एप्रिलमध्ये ३६ लाख ३८ हजार युनिट, मेमध्ये ३८ लाख ११ हजार युनिट, तर जूनमध्ये ३३ लाख ६० हजार युनिट वीज निर्मिती केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com