बांधकाम परवानगीसाठी अर्ज नसलेली १८६ घरकुले रद्दचा प्रस्ताव

बांधकाम परवानगीसाठी अर्ज नसलेली १८६ घरकुले रद्दचा प्रस्ताव

बांधकाम परवानगीसाठी अर्ज नसलेली
१८६ घरकुले रद्दचा प्रस्ताव
प्रधानमंत्री आवास योजना; २१७ घरे पूर्ण
कोल्हापूर, ता. १८ ः प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर झालेल्या घरकुलांतर्गत अजूनही बांधकाम परवानगीसाठी अर्ज केले नसलेली १८६ घरकुले रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. या योजनेतून आतापर्यंत २१७ घरकुले पूर्ण झाली आहेत.
केंद्र सरकारकडून २०१७ पासून ही योजना सुरू केली आहे. त्यातील वैयक्तिक घरकुलांसाठी वेगळी योजना आहे. त्यातील सात विविध योजनांमधून ७६४ घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी ८१ घरकुले रद्द करण्यात आली. त्यानंतर शिल्लक असलेल्या ६८३ घरकुलांसाठी संबंधित नागरिकांनी बांधकाम परवानगीसाठी अर्ज करण्याची गरज होती. पण २०१८ पासून त्यातील १४० नागरिकांनी अर्जच केलेले नाहीत. त्यामुळे पूर्वी रद्द केलेल्या ८१ घरकुलांबरोबर अर्ज न केलेल्या घरकुलांपैकी १०५ जणांची या योजनेतील मंजुरी रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. ५०४ नागरिकांनी बांधकाम परवाना घेतला असून बांधकाम सुरू असणारी २१३ घरकुले आहेत. याबरोबर बांधकाम पूर्ण झालेली २१७ घरकुले आहेत. त्यातील ११० ठिकाणी रहिवास सुरू असून भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही. १०७ जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले आहे.
योजनेत घरकूल मंजूर झालेले असूनही नागरिकांनी पुढील प्रक्रिया केलेली नाही. अनेकांना ती कटकट वाटत असल्याने बांधकाम मंजुरीसाठी कागदपत्रे दिली नाहीत. तरी ज्यांना गरज आहे, त्यांनी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन उपशहर अभियंता नारायण भोसले यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com