स्वसंरक्षण कार्यशाळा

स्वसंरक्षण कार्यशाळा

Published on

‘सकाळ’च्या वर्धापनदिनानिमित्त
युवतींना मिळाले स्वसंरक्षणाचे धडे

गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात कार्यशाळा

कोल्हापूर, ता. २६ : रस्त्यात अडवून कोणी छेड काढली, अचानक कोणी हल्ला केला, बसमध्ये झोंबाझोंबी करण्याचा प्रयत्न केला तर काय करायचे, याचा उलगडा होताच मुलींतील आत्मविश्‍वासाने लढण्याचा बाणा जागला. वुशू प्रशिक्षक सतीश वडणगेकर यांनी स्वसंरक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक दाखवून डावपेचांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले. निमित्त होते वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टतर्फे ‘सकाळ’च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे. गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयातील श्रीमती सुशीलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाउंडेशनने सहकार्य केले.
‘सकाळ’चा ४३ वा वर्धापन दिन १ ऑगस्टला साजरा होत आहे. समाजमनाचा आरसा बनलेल्या ‘सकाळ’ने वैविध्यपूर्ण उपक्रमांतून समाजाशी नाळ घट्ट केली आहे. लोकांच्या मनातील वृत्तपत्र म्हणून त्याची ओळख दृढ झाली असताना त्याच्या वर्धापनदिनानिमित्त स्वसंरक्षणाचा उपक्रम घेण्यासाठी वुशू असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शहरातील पाच महाविद्यालये निश्‍चित केली. त्याची सुरवात गोखले महाविद्यालयातून झाली. प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य डॉ. एन. टी. पाटील यांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले.
श्री. वडणगेकर यांनी बस, रिक्षा व रेल्वे प्रवास, भाजीपाला मार्केट, लिफ्ट, उद्यान, गर्दीच्या ठिकाणी हल्लेखोरांना प्रतिकार कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक दाखवले. एखाद्या टवाळखोरांनीन पर्स ओढण्याचा किंवा गळ्यातील चेन, मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला, तसेच केसातील खेकडा पिन, सेफ्टी पिन, पाण्याची बाटली, पेन, मोबाईल, ओढणी, नोटबुक, कंगवा, छत्री, आयडी कार्ड, स्प्रेचा वापर करत मनोरुग्ण व समाजकंटकांविरुद्ध सामना कसा करावा, याचे प्रशिक्षण दिले. तसेच विनाशस्त्र प्रतिकार कसा करायचा, याची प्रात्यक्षिके मुलींकडून करून घेतली. वैभवी दंडगे, मधुरा मगदूम, स्नेहा सरनाईक, राहत सरगूर, भाग्यश्री शिंदे, सई कावले, धनश्री लोहार, प्रियांका पाटील, श्रेया कुंभार, समृद्धी कुंभार यांनी सहप्रशिक्षक म्हणून काम पाहिले. या वेळी प्रा. एस. एन. मोरे, प्रा. एस. एस. खरात, एम. एम. कामत, प्रा. आर. बी. बिसुरे, प्रा. के. के. पाटोळे आदी उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई, सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. डॉ. पी. बी. आवटे यांनी सूत्रसंचालन केले..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.