रस्ता आहे की नाला!

रस्ता आहे की नाला!

19102
लिंगनूर कसबा नूल : भैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुंबलेले पाणी व चिखलातून विद्यार्थ्यांना मार्ग काढावा लागतो.

रस्ता बनला नाला!
लिंगनूरमधील प्रश्‍न; पाणी-चिखलातून काढावा लागतो मार्ग
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तुंबलेले पाणी आणि चिखलातून या रस्त्यावरील २०० मीटर अंतर कापावे लागते. रस्ता आहे की नाला? असा प्रश्‍न पडावा अशीच ही परिस्थिती आहे. ही गैरसोय दूर करवी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लिंगनूर ते अत्याळ गावाला जोडणारा हा रस्ता आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील भैरवनाथ मंदिराकडे हा रस्ता जातो. पण, मध्येच २०० मीटर अंतरावरील रस्ता झालेला नाही. याबाबत तहसीलदारांकडे सुनावणी झाली होती. मात्र, स्थळ पाहणीसाठी पुढील कार्यवाही थांबलेली आहे.
दरम्यान, पावसामुळे या २०० मीटर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दोन्ही बाजूंनी गटर्स नसल्याने पाणी तुंबलेले आहे. शेतीकामासाठी जाणारे शेतकरी व भैरवनाथ मंदिरात येणारे भाविकांना, या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांना यातूनच मार्ग काढावा लागत आहे. याबाबत ही गैरसोय दूर करावी, अशी मागणी बसगोंडा पाटील, निगोंडा पाटील, मलगोंडा पाटील यांच्यासह ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी केली आहे.
-----------
चौकट
विद्यार्थ्यांची कसरत
विशेष म्हणजे या ठिकाणी राहणारे सहा-सात शालेय विद्यार्थी आहेत. त्यांनाही शाळेला येताना-जाताना यातूनच मार्ग काढावा लागत आहे, यामुळे त्यांची कसरत होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com