डी. वाय. पाटीलच्या कर्मचाऱ्यांचा ‘एक्सलन्स ॲवॉर्ड’ने गौरव

डी. वाय. पाटीलच्या कर्मचाऱ्यांचा ‘एक्सलन्स ॲवॉर्ड’ने गौरव

Published on

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ‘एक्सलन्स ॲवॉर्ड’ स्वीकारताना समीर पाटील. शेजारी डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. आर. के. मुदगल

डी. वाय. पाटीलच्या कर्मचाऱ्यांचा ‘एक्सलन्स ॲवॉर्ड’ने गौरव

कोल्हापूर, ता. २४ : कर्मचाऱ्यांचे योगदान व परिश्रमामुळे डी. वाय. पाटील ग्रुपने ४० वर्षांच्या जी प्रगती केली आहे त्यामागे कर्मचाऱ्यांची मेहनत आहे. या पुढेही ग्रुपला आणखी उंचीवर नेण्यासाठी सर्वांनीच एकदिलाने अधिक चांगले काम करूया, असे आवाहन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘एक्सलन्स ॲवॉर्ड’ने गौरविले. या वेळी ते बोलत होते.​ डॉ. संजय पाटील यांनी ग्रुपच्या आजच्या वैभवामागे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे मोठे परिश्रम ​आहेत. आजवरच्या प्रवासात असंख्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल प्रातिनिधिक गौरव करताना आनंद होत ​असल्याचे सांगितले.
​विश्वस्त व आमदार ऋतुराज पाटील ​यांनी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे विचार, प्रेरणा, संस्कार पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत ​असल्याचे सांगितले. विश्वस्त पृथ्वीराज पाटील ​यांनी ग्रुपच्या माध्यमातून मुलांना केवळ उत्तम शिक्षणच नव्हे तर चांगली मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न ​करत असल्याचे सांगितले. विश्वस्त तेजस पाटील ​यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांचा शिक्षणाचा वारसा आम्ही आणखी ताकतीने पुढे घेऊन जाईल याची खात्री ​दिली. प्राचार्य डॉ. महादेव नरके ​यांनी पाटील कुटुंबीयांकडून मिळणारे मार्गदर्शन व प्रेरणा यामुळे आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते​ असे सांगितले. डॉ. राकेश कुमार मुदगल, डॉ. राकेश कुमार शर्मा, प्राचार्य डॉ. सुहास पाटील, अमिताभ शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी प्रास्तविक​ केले. प्रा. अर्पिता तिवारी व प्रा. राधिका ढणाल यांनी सूत्रसंचालन केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.