डॉ. ए. डी. शिंदे पॉलीटेक्नीकला तंत्रशिक्षणकडून ‘व्हेरी गुड’ श्रेणी

डॉ. ए. डी. शिंदे पॉलीटेक्नीकला तंत्रशिक्षणकडून ‘व्हेरी गुड’ श्रेणी

Published on

डॉ. ए. डी. शिंदे पॉलिटेक्निकला
तंत्रशिक्षणकडून ‘व्हेरी गुड’ श्रेणी
गडहिंग्लज, ता. २६ : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाला राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील कामकाजासाठी ‘व्हेरी गुड’ श्रेणी दिली आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाला ही श्रेणी मिळाली आहे. इतर विभागालाही उत्कृष्‍ट श्रेणी मिळाली आहे.
दरवर्षी तंत्रशिक्षण मंडळाकडून शैक्षणिक कामकाजाचे प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करून भौतिक सुविधा, निकालाची गुणवत्ता, इतर कौशल्य विकसनपूरक उपक्रम, ग्रंथालय, प्रयोगशाळा, कार्यशाळा व तंत्रज्ञान सुविधांच्या मूल्यांकनाद्वारे श्रेणी ठरविण्यात येते. यापूर्वीही संस्थेला अव्वल श्रेणी मिळाले आहे. संस्थापक अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांनी या श्रेणीबद्दल समाधान व्यक्त करुन येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अव्वल श्रेणी कामकाजाचे नियोजन करुन त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना प्राचार्य व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. सचिव स्वाती कोरी यांनी यापुढेही संस्थेतर्फे प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही प्राचार्य अमित शेळके यांना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.