मुख्यमंत्री निधीतून देणार

मुख्यमंत्री निधीतून देणार

मुख्यमंत्री निधीसाठी प्रस्ताव देणार ःजिल्हाधिकारी

कोल्हापूर, ता. २६ : खासबाग कुस्ती मैदानाच्या तटबंदीचा काही भाग कोसळून भोसलेवाडी येथील मयत झालेल्या अश्‍विनी यादव यांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत निधी देण्यासाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे. यासाठी आवश्‍यक कागदपत्रे मागवली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिली.
जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची दखल घेवून यादव यांच्या कुटूंबियांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी संबंधित कार्यालयाला आज सूचना देवून सर्व माहिती व कागदपत्रे एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन व तहसिलदार यांच्याकडून सर्व माहिती घेतली जात आहे. यादव यांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाखांपर्यंतच मदत निधी मिळवून देता येईल. यासाठी आवश्‍यक कागदपत्रे घेवून तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविला जाणार आहे. लवकरात-लवकर हा निधी त्यांना मिळाला पाहिजे. यासाठी सर्व यंत्रणांनी काम काम करावे, अशा सूचनाही रेखावार यांनी दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com