प्रशासनाकडून मुख्याध्यापकांवर बंधने

प्रशासनाकडून मुख्याध्यापकांवर बंधने

Published on

मनपाकडून मुख्याध्यापकांवर बंधने
बनावट विकासकामांच्या पर्दाफाशचा घेतला धसका ः संबंधित विभागातूनच मिळणार माहिती

इचलकरंजी, ता. २६ ः मनपाच्या शाळांबाबतची माहिती बाह्य यंत्रणांना देण्याबाबत आता प्रशासनाकडून मुख्याध्यापकांवर बंधने घातली आहेत. यापुढे माहिती महापालिकेतील संबंधित विभागातूनच दिली जाणार आहे. यााबबतचा आदेश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिला आहे. विविध शाळांतील बनावट विकास कामांचा पर्दाफाश झाला आहे. त्याचा धसका महापालिका प्रशासनाने घेतल्याचे यातून समोर येत आहे.
शहरात मनपाच्या विविध प्राथमिक शाळा आहेत. या शाळांच्या ठिकाणी विविध विकासकामे केल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे महापालिकेच्या निधीचा अपहार केला आहे. याबाबतची पहिल्या टप्प्यात काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यानुसार एका ठेकेदारावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी यामध्ये महापालिकेच्या एका महिला अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला आहे. आणखी काही बनावट बिलांचा प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बनावट प्रकरणांची व्याप्ती पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे.
माजी नगरसेवकांसह काही सामाजिक कार्यकर्ते अशा बनावट कामांची माहिती प्रत्यक्ष शाळांच्या ठिकाणी जावून घेत आहेत. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. याची प्रशासनाने धास्ती घेतली आहे. सुरुवातीला विविध विकासकामांच्या फायली त्रयस्त यंत्रणांना पाहण्यास देण्याबाबत मनाई केली होती. आता एका आदेशानुसार अशा घटकांना माहिती देण्याबाबत मुख्याध्यापकांवर बंधने घातली आहेत. माहितीसाठी महापालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधण्याची विनंती करण्याच्या सूचना त्यांना केल्या आहेत.
----------
नविन कार्यपध्दती विकसीत
बनावट बिलांचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी नविन कार्यपध्दती राबवण्यात येणार आहे. त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात नविन कार्यपध्दतीचा वापर केला जणार आहे. परिणामी, बनावट बिलांच्या माध्यमातून महापालिकेच्या निधीचा होणार अपहार रोखता येणार आहे. ही नविन कार्यपध्दती लवकरच समोर येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.